IND vs ENG : साहेबांनी कसोटीचा बदला T20 मध्ये घेतला, बॅट्समनकडून भारतीय संघाला ‘गुलीगत धोका’!

भारताविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला इंग्लंड संघाने पहिल्याच टी 20 सामन्यात घेतला. | Ind Vs Eng t20 Indian batsmen's first T20 disappointment

IND vs ENG : साहेबांनी कसोटीचा बदला T20 मध्ये घेतला, बॅट्समनकडून भारतीय संघाला 'गुलीगत धोका'!
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला T20 सामना

अहमदाबाद :  भारताविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला इंग्लंड संघाने (Ind vs Eng T20) पहिल्याच टी 20 सामन्यात घेतला. अहमदाबादेत नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव करुन मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मात्र साफ निराशा केली. (Indian batsmen’s first T20 disappointment). श्रेयस अय्यर (Shreyas Ayyar) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) वगळता भारतीय फलंदाजांनी साफ निराशा केली. निर्धारित 20 ओव्हरमध्ये भारताला केवळ 125 धावा करता आल्या. भारताने दिलेलं आव्हान इंग्लंडने अगदी सहज पूर्ण केलं.

भारतीय टॉप ऑर्डरकडून साफ निराशा

भारताकडून सलामीला उतरलेले शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि के.एल.राहुल (KL Rahul) स्वस्तात माघारी परतले. पहिल्या चार ओव्हरमध्ये के.एल. राहुल, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. एकवेळ तर 3 गडी बाद 20 रन्स, अशी भारतीय संघाची अवस्था झाली होती. एकंदर भारतीय टॉप ऑर्डर बॅट्समनने साफ निराशा केली.

इंग्लंडने गोलंदाजीची सुरुवात फिरकीपटू आदिल रशीदपासून करत भारतीय संघाला आश्चर्याचा धक्का दिला. आदिलने सगळ्यात स्वस्त गोलंदाजी तर केलीच पण कर्णधार विराट कोहलीची बहुमूल्य विकेट देखील मिळवली. सलामीवीर के.एल.राहुलचा अडथळा जोफ्रा आर्चरने दूर केला. तर वुडने शिखरला स्वस्तात माघारी धाडलं.

कसोटी क्रिकेटमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या रिषभ पंतने चौथ्या क्रमांकावर येत काही काळ फटकेबाजी केली. ड्रेसिंग रुममधूनच येताना रिषभ अतिशय आत्मविश्वासाने भरलेला दिसून येत होता. खेळपट्टीवर आल्यानंतरही रिषभने काही आत्मविश्वासाने भरलेले तगडे शॉट मारले. जोफ्रा आर्चरला त्याने रिव्हर्स फ्लिकचा अफलातून शॉट मारला. कसोटीनंतर पुन्हा एकदा त्याने हा शॉट खेळल्यावर सगळं स्टेडिअम त्याच्याकडे पाहत राहिलं. मात्र धावसंख्येचा वेग वाढवण्याच्या नादात रिषभ 21 रन्स करुन आऊट झाला.

मुंबईकर श्रेयस अय्यरची बॅट बोलली

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. केएल राहुल, शिखर धवन आणि विराट कोहली स्वसतात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने टीम इंडियाचा डाव सावरला. श्रेयसने फटकेबाजी करत 48 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 67 धावांची खेळी केली

हार्दिक पांड्याने मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यामध्ये तितकंस यश आलं नाही. 21 बॉलमध्ये 19 धावा करुन हार्दिक बाद झाला. शेवटी भारतीय संघाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 125 धावाच करता आल्या.

इंग्लंडची धडाकेबाज सुरुवात

दुसरीकडे भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने शानदार सुरुवात केली. जोस बटलर आणि जेसन रॉय या सलामी जोडीने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये जोरदार फटेकाबाजी केली. पॉवरप्ले मध्येच या जोडीने सलामी अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. इंग्लंडने पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियावर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

(Ind Vs Eng t20 Indian batsmen’s first T20 disappointment)

हे ही वाचा :

India vs England 2021, 1st T20 | जेसन रॉय-जॉस बटलरची फटकेबाजी, इंग्लंडचा भारतावर 8 विकेट्सने शानदार विजय

Published On - 7:28 am, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI