AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : आयर्लंड दौऱ्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठं सरप्राईज.. हॉटेल रूममध्ये काय घडलं ?

भारतीय संघाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी चर्चेत आहे. त्याला सीनियर टीम इंडियाची #3 जर्सी मिळाल्याने त्याचे स्वप्न पूर्ण झाले. थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघु यांच्याकडून जर्सी स्वीकारताना वैभव भावूक झाला. हा भावनिक क्षण बीसीसीआयने शेअर केला असून, २६ जूनपासून सुरू होणाऱ्या भारत-आयर्लंड टी२० मालिकेत त्याच्या कामगिरीची उत्सुकता आहे.

Vaibhav Sooryavanshi : आयर्लंड दौऱ्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठं सरप्राईज.. हॉटेल रूममध्ये काय घडलं ?
वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठं सरप्राईज
| Updated on: Jun 23, 2026 | 12:08 PM
Share

IND vs IRE T20 Series, Vaibhav Sooryavanshi : भारतीय संघ लंडनमार्गे आयर्लंडमधील बेलफास्टला रवाना होणार असून, तिथे 26 जून रोजी पहिला टी-20 सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा नामवंत खेळाडू वैभव सूर्यवंशीय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी, वैभव सूर्यवंशीला ‘3’ क्रमांक असलेली सीनियर भारतीय संघाची जर्सी देण्यात आली. संघाच्या हॉटेलमधील खोलीत ज्या व्यक्तीने त्याला ती जर्सी दिली, त्या व्यक्तीसमोर वैभवने आदराने वक नतमस्तक होऊन अभिवादन केले. जर्सी मिळाल्यावर वैभवच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा होता.

वैभवला कोणी दिली टीम इंडियाची डर्सी ?

वैभव सूर्यवंशीला ‘टीम इंडिया’ची जर्सी मिळाली, तो क्षण बीसीसीआयने (BCCI) रेकॉर्ड करत आणि शेअर केला आहे. भारतीय संघाचे ‘थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट’ असलेल्या रघु यांनी ही जर्सी वैभवच्या हॉटेलच्या खोलीत आणून दिली. जर्सी स्वीकारण्यापूर्वी वैभवने सर्वात पहिले आदराने रघु यांना नमस्कार केला. टीम इंडियाची जर्सी हातात आल्यावर तो बराच वेळ तिच्याकडे एकटक पाहत होता. अत्यंत आनंदी झालेल्या वैभवच्या तोंडातून काही शब्दचं फुटत नव्हते, काय बोलावं, आनंदाच्या भरात कस रिॲक्ट व्हावं हे त्याला सुचत नव्हतं. त्या जर्सीमुळे त्याचं स्वप्न साकार झाल्याची त्याला जाणीव झाली. त्याच्या चेहऱयावरचा आनंद. समाधना पाहून सगळेच भारावले. हा क्षण अगदी पाहण्यासारखा होता.

टीम इंडियाची जर्सी मिळाल्यावर काय म्हणाला वैभव ?

‘टीम इंडिया’ची जर्सी मिळाल्यावर वैभव सूर्यवंशीने पहिली प्रतिक्रिया दिली. ज्या क्षणासाठी आपण हातात बॅट धरली होती, तोच हा क्षण आहे, असं तो भावूक होऊन म्हणाला. . त्याने याला आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटलं. आता काय बोलावं हेच सुचत नाहीये, जर्सी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना असं वैभव म्हणाला की. कधीकधी अशा काही घटना घडतात ज्यांवर त्वरित प्रतिक्रिया देणे कठीण असते; आपली अवस्थाही अगदी तशीच होती—आपला आनंद कसा व्यक्त करावा, हेच त्याला समजत नव्हते. असंही तो म्हणाले.

26 जून रोजी भारताचा आयर्लंड दौरा सुरू होणार असून या दौऱ्यात टी20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. यातील दोन्ही सामने बेलफास्टमध्येच होतील.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी