वेलिंग्टन कसोटीत टीम इंडिया गारद, न्यूझीलंडचा 10 विकेट्सनी सनसनाटी विजय

भारतीय संघावर विजय मिळवत न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटमधील 100 वा विजय साकारला.

वेलिंग्टन कसोटीत टीम इंडिया गारद, न्यूझीलंडचा 10 विकेट्सनी सनसनाटी विजय

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने भारतावर 10 गडी राखून सनसनाटी विजय मिळवला. न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघावर विजय मिळवत न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटमधील 100 वा विजय साकारला. (Ind Vs NZ Wellington Test Match)

दुसऱ्या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला केवळ 9 धावांचं आव्हान दिलं होतं, तेव्हा लॅथम आणि ब्लंडल यांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण करत यजमान संघाचं विजयाचं स्वप्न साकार केलं.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघ 39 धावांनी पिछाडीवर होता. चौथ्या दिवशी कसर भरुन काढण्याची अपेक्षा असतानाच टीम इंडियाने नांगी टाकली. भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त 191 धावा करु शकला.

मयांक अग्रवाल वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्यानंतर एकामागोमाग एक भारताचे फलंदाज तंबूत परतले. भारतावर डावाने पराभव स्वीकारण्याची वेळ आली होती, मात्र तळाच्या ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांनी फटकेबाजी करत भारताचा लाजिरवाणा पराभव टाळला.

याआधी टी20 मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला होता, तर वनडे मालिकेत न्यूझीलंडने पराभवाचा वचपा काढत मालिका 3-0 ने जिंकली होती. (Ind Vs NZ Wellington Test Match)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI