AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा आणि विराट कोहली आज खेळताना दिसणार…कुठे, किती वाजता जाणून घ्या…

आता एकाच दिवशी वेगवेगळ्या देशात भारतीय संघाचे सामने रंगणार आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा पर्वणी ठरणार आहे.

वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा आणि विराट कोहली आज खेळताना दिसणार...कुठे, किती वाजता जाणून घ्या...
| Updated on: Oct 03, 2026 | 7:49 AM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेचा फायनल सामना आज रंगणार आहे. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला १२४ धावांनी पराभूत करुन फायनल फेरी गाठली आहे. आता आज भारतीय युवा संघ पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. यासोबतच आता एकाच दिवशी दोन सामने खेळले जाणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांविरुद्ध सामने खेळणार आहे. सर्वप्रथम, जपानमध्ये होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा टी-२० संघ पाकिस्तानचा सामना करेल. त्यानंतर आजच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामनाही खेळला जाईल. मात्र, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, १९९८ मध्ये टीम इंडियाने एकाच दिवशी दोन सामने खेळले होते.

हे १२ सप्टेंबर, १९९८ रोजी घडले होते. टीम इंडियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच दिवशी, टीम इंडियाने सहारा कपमध्ये पाकिस्तानविरुद्धही सामना खेळला होता. भारताने दोन्ही सामने जिंकले होते. २८ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. आता हे पाहणे बाकी आहे की टीम इंडिया पुन्हा एकदा एकाच दिवशी खेळलेले आपले दोन्ही सामने जिंकेल की नाही.

२०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. सुवर्णपदकाचा सामना निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे खेळला जाईल. विजयी संघाला सुवर्णपदक मिळेल, तर पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सुरू होईल.

वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्याव्यतिरिक्त, भारतीय संघ शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामनाही खेळणार आहे. हा सामना न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला जाईल. नाणेफेक दुपारी १:३० वाजता होईल आणि सामना दुपारी २:०० वाजता सुरू होईल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे, कॅरिबियन संघ व्हाईटवॉश टाळू इच्छितो, तर भारतीय संघ क्लीन स्वीप करण्याचे लक्ष्य ठेवेल. यामुळे आता एकाच दिवशी वैभव सूर्यवंशी, विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे.

Follow Us
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला