Irfan Pathan Ind vs Pak : भारत विजयी होताच इरफान पठाणने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, एका मिनिटात….
Irfan Pathan after India vs Pakistan match : टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने पाकिस्तानच्या पराभवानंतर एका मिनिटाच्या आत तीन पोस्ट केल्या. या तीनपैकी एक पोस्ट पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारी होती.

Irfan Pathan after India vs Pakistan match : इरफान पठाण आणि पाकिस्तान यांचे संबंध सर्वश्रृत आहेत. इरफान क्रिकेट खेळायचा, त्यावेळी पाकिस्तान विरुद्ध नेहमीच त्याचं प्रदर्शन उजवं असायचं. आता तो क्रिकेटमधून निवृत्त झालाय. पण पाकिस्तानची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडत नाही. 21 सप्टेंबरला दुबईत आशिया कप 2025 टुर्नामेंटमध्ये सुपर-4 च्या निमित्ताने भारत-पाकिस्तानच्या टीम आमने-सामने आल्या. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करताच इरफान पठाणला पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळण्याची संधी मिळाली. पाकिस्तानच्या पराभवानंतर इरफान पठाण इतका खुश झाला की, त्याने एका मिनिटात 3 पोस्ट आपल्या एक्स हँडलवर टाकल्या. यात एक पोस्ट थेट पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारी होती.
आता प्रश्न हा आहे की, इरफान पठाणच्या त्या तीन पोस्ट काय आहेत?. इरफान पठाणने या तीन पोस्ट रात्री 12 ते 12 वाजून एक मिनिटादरम्यान केल्या. त्याने 12 वाजता पहिली पोस्ट केली. यात लिहिलेलं, तिलक वर्मा शानदार फिनिश.
दुसरी पोस्ट त्याने आपल्या एक्स हँडलवर 12 वाजून काही सेकंदांनी केली. त्यात टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा देताना लिहिलं की, त्यांचा क्लास कुठल्याही टीमपेक्षा मोठा आहे.
Brilliant finish from Tilak Varma.
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 21, 2025
इरफान पठाणच्या पहिल्या दोन पोस्टमुळे कदाचित पाकिस्तानला एवढं काही वाटणार नाही. पण त्याने तिसरी पोस्ट रात्री 12 वाजून एक मिनिटांनी केली, तो थेट पाकिस्तावर हल्ला होता. इरफान पठाणने आपल्या पोस्टमध्ये पाकिस्तानच नाव घेतलं नाही. पण त्याच्या निशाण्यावर पाकिस्तानच होता. इरफान पठाणने पाकिस्तानच्या पराभवानंतर लिहिलेलं की, हां जी, कसा होता संडे?
Well done team India 🇮🇳. You are class above all the other teams.
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 21, 2025
Hanji, kesa raha sunday?
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 21, 2025
इरफान पठाणने याआधी सुद्धा पाकिस्तानवर बोचरी टीका केली आहे. इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध नेहमीच सर्वोत्तम प्रदर्शन केलं. आशिया कप 2025 सुपर 4 च्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 विकेटने हरवलं.
