AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रेडिट खुद चलके आ जाता है…भारताला पराभवाचा धक्का दिला अन् विंडीजचा कर्णधार म्हणाला, ते धोनीमुळे…

Shai Hope On MS Dhoni: वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने आता महेंद्र सिंग धोनीमुळे कसं वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी फायदा झाला हे बोलून दाखवले आहे.

क्रेडिट खुद चलके आ जाता है...भारताला पराभवाचा धक्का दिला अन् विंडीजचा कर्णधार म्हणाला, ते धोनीमुळे...
| Updated on: Oct 04, 2026 | 8:27 AM
Share

IND vs WI 3rd ODI: कर्णधार शाई होपच्या नाबाद १६२ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३५२ धावांचे लक्ष्य ५ गडी राखून पूर्ण केले. तिसरा सामना हरला असला तरी, भारताने मालिका २-१ ने जिंकली. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाने ४८.२ षटकांत सामना पूर्ण केला. कर्णधार शाई होपने १४३ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि १७ चौकारांसह नाबाद १६२ धावा केल्या, तर अमीर जांगूने ६७ धावा केल्या. कीमो पॉलनेही संघासाठी ४४ धावांचे योगदान दिले. सामन्यातील विजयानंतर कर्णधार शाई होपने एक विधान केले आता त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सामन्यानंतर, कर्णधार शाईने एक विशेष खुलासा केला आणि धोनीच्या एका सल्ल्यामुळे त्याला सामना जिंकण्यास कशी मदत झाली हे स्पष्ट केले.  होप म्हणाला की, धोनी नेहमी एक सल्ला देतो तो म्हणजे तुमच्याकडे तितकाच वेळ असतो जेवढा तुम्ही गृहीत धरलेला असतो, तर धोनीच्या याच सल्ल्यामुळे मला संयम राखण्यास आणि सामना जिंकण्यासाठी कोणती रणनीती वापरावी लागेल. यामुळे मला नाबाद १६२ धावा करण्यास मदत झाली.” शाई होपच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात, होपने १४३ चेंडूंमध्ये नाबाद १६२ धावा केल्या, ज्यामुळे वेस्ट इंडिजने भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला.

शाई होप एकदिवसीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा फलंदाज बनला आहे, त्याने २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ख्रिस गेलच्या १६२ धावांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना ही सर्वोच्च धावसंख्या आहे. वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशानचा विक्रम मोडला आहे, ज्याने २००९ मध्ये राजकोट येथे १६० धावांची खेळी केली होती. भारतीय संघाकडून डेथ ओव्हर्समध्ये अतिशय घाणेरडी बॉलिंग केली गेली. अंशुल कंबोजला वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी धु धु धुतले ज्यामुळे विडिंजने सहज सामना जिंकला.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर