भारताच्या सैन्यामध्ये या पाच खेळाडूंना थेट नोकरी, 3 क्रिकेटरचा समावेश इतर 2 कोण?

देशांचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात येतो त्यांना भारतीय सेनेमध्ये घेतलं जातं. असे पाच खेळाडू आहेत ज्यांना सैन्यात सामील करून घेतलं. कोण आहेत ते पाच खेळाडू ज्यांचा भारतीय सैन्यात समावेश केला गेलाय जाणून घ्या.

भारताच्या सैन्यामध्ये या पाच खेळाडूंना थेट नोकरी, 3 क्रिकेटरचा समावेश इतर 2 कोण?
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 5:44 PM

भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झालेला पाहायला मिळाला. देशभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर काही ठिकाणी प्रभात फेरी काढत विविध सामाजिक विषयांबाबत जनजागृती करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय सेना सीमेवर आपल्या देशाचं संरक्षण करत आहेत. शत्रूंच्या हल्ल्यापासून आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी ते देशसेवा करतायेत. देशांचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात येतो त्यांना भारतीय सेनेमध्ये घेतलं जातं. असे पाच खेळाडू आहेत ज्यांना सैन्यात सामील करून घेतलं.

क्रिकेटमध्ये आपल्या नेतृत्त्वामध्ये भारताला 1983 साली पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांना सैन्यात सामील करून घेण्यात आलं होतं. 2008 साली कपिल देव यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं.  क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला 2010 मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये कॅप्टन बनवलं गेलं होतं. सचिन तेंडुलकरला विमानाबाबत कोणतीही पार्श्वभूम नसलेला पहिला व्यक्ती ठरला.

भारताचा क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार असलेला महेंद्रसिंह धोनालाही लेफ्टनंट कर्नल करत सन्मानित करण्यात आलं होतं. भारताने कपिल देव यांच्यानंतर वन डे वर्ल्ड 2011 वर आपलं नाव कोरलं होतं. 2011 ला भारताने वर्ल्ड कप जिंकला त्याचवर्षी धोनीला सन्मानित करण्यात आलं होतं.

2008 मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक जिंकलं होतं. नेमबाजीमध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. 2011मध्ये अभिनव बिंद्राला लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित केलं गेलं होतं. पाचवा खेळाडू म्हणजे यंदाच्याही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या खेळाडूने पदक जिंकलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून नीरज चोप्रा आहे.

नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला होता. 2016 मध्ये नीरजला भारतीय सैन्यदलामध्ये राजपूताना रायफल्स युनिटमध्ये (ज्यूनियकर कमिशन्ड ऑफिसर) नायब सुबेदार म्हणून घेतलं होतं. त्यानंतर 2018 साली नीरजला सुबेदार म्हणून मेजर प्रमोशन केलं.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.