110 धावा करताना भारताची दमछाक, थरारक सामन्यात पाच विकेट्सनी विजय

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या थरारक टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर पाच विकेट्स राखून मात केली. वेस्ट इंडिजला 109 धावात बाद केल्यानंतर भारताचा सहज विजय होईल असं वाटत होतं. मात्र विंडीजच्या दमदार गोलंदाजीमुळे काही वेळासाठी भारतीय प्रेक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर भारताने या सामन्यात पाच विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी …

, 110 धावा करताना भारताची दमछाक, थरारक सामन्यात पाच विकेट्सनी विजय

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या थरारक टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर पाच विकेट्स राखून मात केली. वेस्ट इंडिजला 109 धावात बाद केल्यानंतर भारताचा सहज विजय होईल असं वाटत होतं. मात्र विंडीजच्या दमदार गोलंदाजीमुळे काही वेळासाठी भारतीय प्रेक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर भारताने या सामन्यात पाच विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली.

110 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला पहिला धक्का लागला तो म्हणजे कर्णधार रोहित शर्माच्या रुपाने. रोहित केवळ सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि रिषभ पंतही स्वस्तात माघारी परतले. लोकेश राहुलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही कार्लोस ब्रेथवेटने माघारी पाठवलं.

विंडीजच्या गोलंदाजांनी भारतासाठी 110 धावांचं माफक आव्हानही कठिण करुन ठेवलं होतं. अखेर दिनेश कार्तिक आणि मनीष पांडे यांच्यातील भागीदारीमुळे भारताचा विजय सोपा झाला. मनीष पांडे बाद झाल्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने नऊ चेंडूत 21 धावा करत दिनेश कार्तिकच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.

पहिलाच सामना खेळत असलेल्या कृणाल पंड्याने सर्वांची मनं जिंकली. अगोदर गोलंदाजीतून आणि नंतर आपल्या फलंदाजीतून त्याने अष्टपैलू कामगिरी केली. कृणाल पंड्याने चार षटकांमध्ये 15 धावा देत एक विकेटही घेतली होती.

भारतीय गोलंदाजांची कामगिरी या सामन्यात अत्यंत दमदार होती. कुलदीप यादवने तीन जणांना माघारी पाठवत विंडीच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. जसप्रीत बुमरा, खलील अहमद आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.

तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढचा सामना 6 नोव्हेंबरला लखनौमध्ये, तर अखेरचा आणि तिसरा सामना 11 नोव्हेंबरला चेन्नईत खेळवण्यात येईल. विंडीजनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *