AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | ‘रनमशीन’ विराट कोहलीवर तब्बल 761 डावानंतर ओढावली नामुष्की

विराट कोहली (India captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात (dismissed for zero) शून्यावर बाद झाला.

Virat Kohli | 'रनमशीन' विराट कोहलीवर तब्बल 761 डावानंतर ओढावली नामुष्की
विराट कोहली (India captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात (dismissed for zero) शून्यावर बाद झाला.
| Updated on: Mar 13, 2021 | 11:43 AM
Share

अहमदाबाद : विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाचा कर्णधार. विराटने आपल्या कारकिर्दीत अनेकदा भारताला एकहाती विजय मिळवून दिला आहे. विराट सक्रीय फलंदाजांपैकी सर्वात यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे. विराट या दोन्ही जबाबदाऱ्या सार्थपणे पार पाडत आहेत. मात्र क्रिकेटमध्ये प्रत्येकाच्या कारकिर्दीत चढ उतार येतातच. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. सध्या विराट गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करताना दिसत आहे. विराटला मागील काही महिन्यांपासून सूर गवसलेला नाहीये. त्यामुळे विराटवर प्रचंड टीकाही करण्यात येत आहे. दरम्यान आता विराटच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. (India captain Virat Kohli has been dismissed for zero for the second time in a row in 761 innings of his cricket career)

नक्की प्रकार काय ?

शुक्रवारी 12 मार्चला इंग्लंड विरुद्ध पहिला टी 20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. बॅटिंगसाठी मैदानात आलेला विराट शून्यावर बाद झाला. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. याआधी विराट इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भोपळा न उघडता तंबूत परतला होता. विराटवर अशी नामुष्की तब्बल 761 डावांनंतर ओढावली आहे. विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय, स्थानिक आणि अन्य स्पर्धांमध्ये मिळून एकूण 761 डावांमध्ये फलंदाजी केली आहे.

मागील 5 डावात 3 वेळा शून्यावर बाद

विराट गेल्या 5 डावांमध्ये 3 वेळा शून्यावर बाद झाला आहे. तसेच सलग 2 वेळा भोपळा न उघडता माघारी परतला आहे.

सर्वाधिक वेळा शून्यावर होणारा भारतीय कर्णधार

विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने याबतीतत गांगुलीला पछाडलं आहे. गांगुली एकूण 13 वेळा शून्यावर बाद झाला. तर विराटची ही कर्णधार म्हणून शून्यावर बाद होण्याची 14 वेळ ठरली.

पहिल्या सामन्यात पराभव

दरम्यान भारताला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे माफक आव्हान दिले. पाहुण्यांनी हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15. 3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 28 तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 26 धावा केल्या. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

दुसरी टी-20 मॅच 14 मार्चला

दरम्यान उभय संघातील दुसरा टी 20 सामना 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे. या मॅचचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून जोरदार पुनरागमन करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Virat Kohli | कर्णधार विराट कोहलीच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, ‘या’ बाबतीत गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक

(India captain Virat Kohli has been dismissed for zero for the second time in a row in 761 innings of his cricket career)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.