टीम इंडियाचा शिलेदार मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन, कोरोनाच्या नियमांमुळे अंत्यसंस्कारांना मुकणार

भारतीय संघाचा शिलेदार मोहम्मद सिराज याच्या वडिलांचं निधन झालं आहे. कोरोनाच्या नियमांमुळे सिराज वडिलांच्या अंत्यसंस्कारांना हजर राहू शकणार नाही.

टीम इंडियाचा शिलेदार मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन, कोरोनाच्या नियमांमुळे अंत्यसंस्कारांना मुकणार
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 2:43 PM

नवी दिल्ली : भारतीय संघ (Team India) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India tour of Australia) आहे. या दौऱ्यात आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (Royal Challengers Bangalore) खेळणारा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याचीदेखील निवड झाली आहे. त्यामुळे सिराज सध्या भारतीय संघासमवेत सिडनी येथे क्रिकेटचा सराव करतोय. दरम्यान काल (20 नोव्हेंबर) सिराजचे वडील मोहम्मद गौस (53) यांचं निधन झालं आहे. फुफ्फुसांशी संबंधित आजाराने ते त्रस्त होते, त्यावर उपचारही सुरु होते, परंतु त्यातच त्यांचे निधन झालं आहे. (India pacer Mohammed Siraj’s father passes away, could not be able to attend the funeral due to Corona rules)

वडिलांच्या निधनाने सिराजला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सिराज म्हणाला की, मी माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टिम गमावली आहे. दरम्यान, कोरोनाबाबतच्या निर्बंधांमुळे सिराज त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहू शकणार नाही.

सिराजचे वडील रिक्षाचालक होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोहम्मद गौस यांनी त्यांच्या मुलाला वाढवलं आणि त्याचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्नदेखील पूर्ण केलं. सिराजची नुकतीच 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. चार सामन्यांच्या या मालिकेत सिराजला अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. परंतु आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय कसोटी संघात पदार्पण करताना पाहण्याचे त्याच्या वडिलांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

पिता मोहम्मद गौस यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सिराजने एक भावूक संदेश दिला आहे. सिराज म्हणाला की, हा माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार गमावला आहे. मला देशासाठी खेळताना पाहण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मी ते पूर्ण केल्याचा मला आनंद आहे.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन मोहम्मद गौस यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. आरसीबीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की “मोहम्मद सिराजने त्याच्या वडिलांना गमावलं आहे. त्याचं आणि त्याचा परिवाराचं आम्ही सांत्वन करतो. आमच्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत. या कठीण प्रसंगात संपूर्ण आरसीबी परिवार तुझ्यासोबत आहे. कणखर राहा”.

मोहम्मद सिराजने भारतासाठी एक एकदिवसीय सामना आणि तीन टी-20 सामने खेळले आहेत. त्याने तीन टी-20 सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्याने खेळलेल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नव्हता. तर आयपीएलमध्ये 35 सामन्यांमध्ये त्याने 39 विकेट्स मिळवल्या आहेत. 32 धावात 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने एकाच सामन्यात दोन निर्धाव षटकं टाकण्याचा रेकॉर्ड केला होता. असा रेकॉर्ड करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

इतर बातम्या

IPL 2020, KKR vs RCB : मोहम्मद सिराजची धडाकेबाज कामगिरी, ठरला पहिलाच गोलंदाज

भारतीय संघाच्या ‘या’ सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार?

(India pacer Mohammed Siraj’s father passes away, could not be able to attend the funeral due to Corona rules)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.