AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer | भारताचा चमकता तारा श्रेयस अय्यर इंग्लंडच्या लंकाशायर संघाकडून खेळणार

भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर रॉयल लंडन कप 2021 साठी इंग्लंडच्या काऊंटी क्लब लंकाशरकडून खेळणार आहे. India Shreyas iyer Will Play England Club lancashire

Shreyas Iyer | भारताचा चमकता तारा श्रेयस अय्यर इंग्लंडच्या लंकाशायर संघाकडून खेळणार
Shreyes iyer
| Updated on: Mar 23, 2021 | 3:24 PM
Share

मँचेस्टर : भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर (Shreyas iyer) रॉयल लंडन कप 2021 (Royal Cup 2021) साठी इंग्लंडच्या काऊंटी क्लब लंकाशरकडून (England Club lancashire) खेळणार आहे. क्लबने सोमवारी ही घोषणा केलीय. लंकाशायर क्रिकेट क्लब 2021 साठी विदेशी खेळाडू म्हणून भारताचा आंतरराष्ट्रीय फलंदाज श्रेयस अय्यर खेळणार आहे. ही घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, असं क्लबने म्हटलंय. (India Shreyas iyer Will Play England Club lancashire Fifty over Tournament)

भारतासाठी 21 एकदिवसीय आणि 29 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला श्रेयस या टूर्नामेंटसाठी 15 जुलै रोजी ओल्ड ट्रॅफर्डला पोहोचणार आहे. तो टीममध्ये एक महिन्यापर्यंत ग्रुप मॅचेस खेळेल, अशी माहिती क्लबने दिली आहे.

श्रेयस काय म्हणाला…?

क्लबने केलेल्या घोषणेनंतर श्रेयसने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “लंकाशायरचं इंग्लंड क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट नाव आहे. ज्या स्पर्धेचा भारतीय क्रिकेटशी संबध आहे. लंकाशायर क्लबमध्ये फारुख इंजिनिअर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासारख्या महान खेळाडूंचा वारसा पुढे नेण्याचा मला अभिमान आहे”.

क्लबने काय म्हटलं…?

लंकशायरचे क्रिकेट संचालक पॉल अलॉट म्हणाले की, श्रेयस हा भारतीय फलंदाजांच्या नव्या पिढीतील चमकणारा तारा आहे. ‘यंदाच्या’ द हंड्रेड ‘स्पर्धेमुळे आम्ही रॉयल लंडन कपमध्ये एका युवा संघाला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत आव्हान ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी खेळाडूला अव्वल-फळीतील फलंदाजीत ठेवणे आवश्यक होते”, असंही ते म्हणाले.

श्रेयसकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय आयपीएलचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.फारूक इंजिनिअर, गांगुली आणि लक्ष्मण व्यतिरिक्त मुरली कार्तिक आणि दिनेश मोंगिया यांनीही लँकशायरचे प्रतिनिधित्व केले आहे. (India Shreyas iyer Will Play England Club lancashire Fifty over Tournament)

हे ही वाचा :

PHOTO | इंग्लंड विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टीम इंडियाचे टॉप 5 फलंदाज

NZ vs BAN : सॉफ्ट सिग्नल पुन्हा चर्चेत, काइली जॅमीसनचा अफलातून कॅच, तिसऱ्या अंपायरने निर्णय बदलला, पुढे इकबालने ठोकलं…!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.