AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केदार जाधव, मनिष पांडेच्या आंतरराष्ट्रीय खेळीला कायमचा फुल्लस्टॉप? बघा BCCI च्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधले 7 कोटीवाले तीन दिग्गज

केदार जाधव (Kedar jadhav) आणि मनीष पांडे (Manish Pandey) यांना बीसीसीआयने कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून वगळलं आहे. (Kedar And Manish pandey Out BCCI Contract List)

केदार जाधव, मनिष पांडेच्या आंतरराष्ट्रीय खेळीला कायमचा फुल्लस्टॉप? बघा BCCI च्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधले 7 कोटीवाले तीन दिग्गज
केदार जाधव आणि मनीष पांडे
| Updated on: Apr 16, 2021 | 8:14 AM
Share

मुंबईबीसीसीआयने कॉन्ट्रॅक्ट (BCCI Contract List) केलेल्या खेळाडूंची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. भारताच्या क्रिकेट संघात संधी मिळूनही त्या संधीचा फायदा न उठवणारे केदार जाधव (Kedar jadhav) आणि मनीष पांडे (Manish Pandey) यांना बीसीसीआयने कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून वगळलं आहे. बीसीसीआयने लिस्टमधून भारताचे दोन तगड्या बॅट्समनला वगळलं आहे. आयपीएलचा शानदार मोसम सुरु असताना या खेळाडूंना मोठा धक्का बसलाय. त्यामुळे बीसीसीआयने केदार जाधव, मनिष पांडेच्या आंतरराष्ट्रीय खेळीला कायमचा फुल्लस्टॉप दिलाय की काय?, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. (India team Batsman Kedar Jadhav And Manish Pandey Out BCCI Contract List)

बीसीसीआयने करार केल्यानुसार भारताच्या 28 क्रिकेटपटूंना 4 कॅटॅगरीमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kolhi), उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) तसंच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहेत म्हणजेच त्यांचा समावेश लिस्ट ए मध्ये करण्यात आलेला आहे. ह्या तीन क्रिकेटपटूंना 7 कोटी रुपयांचं मानधन मिळणार आहे.

आतापर्यंत बीसीसीआयच्या लिस्टमध्ये केदार जाधव आणि मनीष पांडे यांचा समावेश होता. परंतु भारतीय संघात वेळोवेळी संधी देऊनही या दोघांकडून सातत्यपूर्ण खेळ झाला नाही. किंबहुना त्यांना मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं नाही. याचमुळे बीसीसीआयने त्यांना कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून वगळल्याची चर्चा आहे.

केदार जाधव

भारताचा 36 वर्षांचा आक्रमक बॅट्समन केदार जाधवचा बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये समावेश होणार नाही. हे जवळपास निश्चित होतं. केदार जाधव 2020 मध्ये अखेरचा सामना न्यूझीलंडच्या दौऱ्यावर खेळला होता. त्यावेळी तो दोन सामन्यात 35 धावा करू शकला. याआधीही त्याला भारतीय संघासाठी सातत्यपूर्ण धावा काढण्यात यश येत नव्हतं. 2019 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर त्याला त्यानंतर अर्धशतक झळकावण्यात यश आलं नाही. तसंच मागील काही दिवसांपासून त्याची फिटनेसची समस्या देखील आहे. तो अनफिट असल्याचं सातत्याने बोललं जातं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात त्याने टीम इंडियामध्ये स्थान निश्चित केले होते. त्याने भारतासाठी अनेक उत्तम कामगिरी केली. परंतु मागील काही दिवसांत त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नाही.

केदार जाधवची भारतीय संघातली कामगिरी

केदार जाधवने भारताकडून 73 एकदिवसीय सामने खेळले आणि 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या. या दरम्यान त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली. त्याने 27 विकेट्सही घेतल्या. तसेच त्याने भारताकडून 9 टी -20 सामने खेळले. यात त्याने 122 धावा केल्या.

मनीष पांडे

मनिष पांडेने देखील टीम इंडियामध्ये मिळालेल्या संधींचा फायदा घेतला नाही. जानेवारी 2020 मध्ये त्याचं भारताच्या एकदिवसीय संघात पुनरागमन झालं पण तीन सामन्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या 42 धावा होती. पण याच काळात त्याला अधिक संधी दिली गेली नाही, हे देखील तथ्य आहे. त्याने भरपूर मॅचेस डगआऊटमध्ये बसून काढल्या आहेत. त्याला संधी मिळायला हवी होती, असं भारताच्या माजी क्रिकेटपटूंना वाटत होतं.

यादरम्यान, ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत तो सतत टीम इंडियाचा भाग राहिला. त्याने यावेळी 57 च्या सरासरीने 171 धावा केल्या. तथापि, या काळात खेळल्या गेलेल्या 11 सामन्यात तो फक्त एकदाच अर्धशतक ठोकू शकला. परंतू त्याचा स्ट्राइक रेट 120 च्या आसपास राहिला. आक्रमक फलंदाजी करण्यासाठी मनीष पांडे ओळखला जातो.

मनीष पांडेची भारतीय संघातली कामगिरी

31 वर्षीय मनीष पांडेने 2015 मध्ये भारतीय संघात प्रवेश केला होता. परंतु त्याला एकसलग संधी मिळाली नाही.त्याने आतापर्यंत भारतासाठी 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 1 शतक आणि दोन अर्धशतकांसह 492 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 39 टी ट्वेन्टी सामन्यात त्याने तीन अर्धशतकांसह 709 धावा केल्या आहेत.

(India team Batsman Kedar Jadhav And Manish Pandey Out BCCI Contract List)

हे ही वाचा :

IPL 2021 : रिषभ पंतला आऊट केल्यावर खेळाडू मैदानातच नाचला, Video व्हायरल

IPL 2021: पहिल्या मॅचमध्ये संजूने दिली नाही स्ट्राईक, दुसऱ्या मॅचमध्ये चमकला ख्रिस मॉरिस!

RR vs DC, IPL 2021 Match 7 Result | ख्रिस मॉरीसचा ‘हल्ला बोल’, रंगतदार सामन्यात राजस्थानची दिल्लीवर 3 विकेट्सने मात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.