India vs Australia 2020 | विराटला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘या’ दिग्गज कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Australia 2020 | विराटला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 'या' दिग्गज कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 4:20 PM

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाने (Australia) टीम इंडियावर (Team Indian) पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात विजय (India Tour Australia 2020-21) मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला कॅनबेरा येथे खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे. विराटने (Virat Kohli) आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून दिल्यास त्याला एका विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी विराटला आहे. india vs australia 2020 captain virat kohli to equal former captain kapil dev record if he wins 3rd ODI against australia

काय आहे विक्रम?

कपिल देव यांनी टीम इंडियाचं ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 19 एकदिवसीय सामन्यात नेतृत्व केलं आहे. या 19 पैकी 9 सामन्यात कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. तसेच विराटनेही आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरोधात 19 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. विराटने आपल्या कॅप्टन्सीमध्ये 19 पैकी 8 सामन्यात विजयश्री मिळवून दिला आहे. त्यामुळे विराटने जर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून दिला, तर विराट कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी करेल. तसेच टीम इंडियासाठी एकदिवसीय मालिकेचा शेवटही गोड होईल.

धोनी ऑस्ट्रेलियाविरोधातील यशस्वी कर्णधार

महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा आतापर्यंत यशस्वी कर्णधार राहिला आहे. आपल्याच नेतृत्वात धोनीने ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विजय मिळवून दिलं आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाविरोधातील 40 सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केलं आहे. या 40 पैकी 21 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. याबाबतीत दुसरा क्रमांक मोहम्मद अजहरुद्दीनचा लागतो. अजहरुद्दीने ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 21 सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केलंय. यापैकी 13 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. तर सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने ऑस्ट्रेलियाविरोधातील एकूण 16 सामन्यांपैकी 11 सामन्यात कांगारुंना पराभवाची धूळ चारली आहे.

तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला

या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्न असणार आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर 3 टी 20 सामन्यांची आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण

India vs Australia 2020 | कोहलीची कॅप्टन्सी समजणे अवघड, गंभीरचा विराटवर हल्लाबोल

india vs australia 2020 captain virat kohli to equal former captain kapil dev record if he wins 3rd ODI against australia

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.