India vs England 1st Test | इशांत शर्माचा किर्तीमान, मानाच्या पगंतीत स्थान

डेन लॉरेन्सला बाद करताच इशांत शर्माच्या (ishant sharma) नावावर अफलातून विक्रमाची नोंद झाली आहे.

India vs England 1st Test | इशांत शर्माचा किर्तीमान, मानाच्या पगंतीत स्थान
इशांत शर्मा
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 3:53 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड  (india vs england 2021 1st Test) यांच्यात चेन्नईत पेटीएम टेस्ट सीरिजमधील पहिली टेस्ट मॅच खेळण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इशांत शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यासह त्याने मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. (india vs england 2021 1st test day 4 ishant sharma become 3rd indian fastest bowler who take 300 wickets in test cricket)

काय आहे ऐतिहासिक कामगिरी?

इशांतने कसोटी क्रिकेटमधील 300 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडचा डेन लॉरेन्स इशांतचा 300 वा बळी ठरला. इशांतने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 16 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर डेन लॉरेन्सला 18 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. यासह इशांतने कपिल देव आणि झहीर खान यांच्यात पगंतीत स्थान मिळवलं. बीसीसाआयने या संदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. इशांत टीम इंडियाकडून 300 विकेट्स घेणारा ओव्हरऑल सहावा तर तिसरा वेगवान गोलंदाज ठरला.

बीसीसाआयने केलेलं ट्विट

300 विकेट्स घेणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज

कपिल देव, 434 विकेट्स

जहीर खान, 311 विकेट्स

इशांत शर्मा, 300* विकेट्स

भारतासाठी 300 पेक्षा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

अनिल कुंबले – 619

कपिल देव – 434 विकेट्स

हरभजन सिंह – 417 विकेट्स

रवीचंद्नन अश्विन – 382 विकेट्स

झहीर खान- 311 विकेट्स

इशांत शर्मा – 300 विकेट्स *

नकोशा विक्रमाची नोंद

या विक्रमासह इशांतच्या नावे नकोशा विक्रमाचीही नोंद झाली आहे. कसोटीमध्ये सर्वात संथ 300 विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने 98 सामन्यांमध्ये 300 विकेट्स पूर्ण केल्या. याआधी हा विक्रम न्यूझीलंडचा माजी फिरकी गोलंदाज डॅनियल व्हेटोरीच्या नावे होता. व्हिटोरीने 94 टेस्टमध्ये 300 विकेट्स मिळवल्या होत्या.

इशांत शर्माने 25 मे 2007 रोजी बांगलादेश विरूद्ध ढाका येथे कसोटी पदार्पण केलं होतं. इशांतने आतापर्यंत 98 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. इतकेच नव्हे तर इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना ठरेल.

संबंधित बातम्या :

Washington Sundar | वॉशिंग्टनची नाबाद 82 धावांची ‘सुंदर’ खेळी, इतर खेळाडूंमुळे शतकाची संधी हुकली, नेटकऱ्यांकडून संताप

India vs England 1st Test | रिषभ पंतसोबतच्या शतकी भागीदारामुळे चेतेश्वर पुजारा आनंदी, म्हणाला…..

India vs England 1st Test | फिरकीपटू अश्विनची शानदार कामगिरी, ठरला तिसरा भारतीय गोलंदाज

(india vs england 2021 1st test day 4 ishant sharma become 3rd indian fastest bowler who take 300 wickets in test cricket)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.