Ind Vs Eng : चौथ्या कसोटीअगोदर मायकल वॉर्नची खोदलेल्या पीचवरुन रिपोर्टिग, भारताला ट्रोल करण्याचा प्रयत्न

भारताविरुद्ध तिसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडचा 10 विकेट्सने झालेला पराभव इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉर्नच्या भलताच जिव्हारी लागलाय. | Michael vaughan pitch reporting Video)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:51 PM, 3 Mar 2021
Ind Vs Eng : चौथ्या कसोटीअगोदर मायकल वॉर्नची खोदलेल्या पीचवरुन रिपोर्टिग, भारताला ट्रोल करण्याचा प्रयत्न
michael vaughan

मुंबई : भारताविरुद्ध तिसऱ्या मॅचमध्ये (India Vs England) इंग्लंडचा 10 विकेट्सने झालेला पराभव इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉर्नच्या (Michael vaughan) भलताच जिव्हारी लागलाय. भारतीय फिरकीपटूंनी आणि खेळपट्टीने दाखवलेला इंगा आणि इंग्लंडचा 10 विकेट्सने झालेला पराभव वॉर्नच्या मनातून जाता जात नाहीय. अशातच चौथ्या कसोटीअगोदर मायकल वॉर्नचा खोदलेल्या पीचवरुन रिपोर्टिग करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (india Vs England 4th test Michael vaughan Narendra Modi Stadium ahmedabad match pitch reporting Video)

मायकेलचा व्हायरल झालेला व्हिडीओ :

मायकल वॉनने आपल्या इन्स्ट्राग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तो खोदलेल्या पीचवरुन रिपोर्टिंग करताना दिसून येत आहे. उद्याच्या खेळपट्टीचा गमतीशीर वेध त्याने या व्हिडीओमधून घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Michael vaughan (@michaelvaughan)

वॉर्नकडून व्हिडीओअगोदर फोटो पोस्ट

मायकल वॉनने 2 मार्च रोजी असाच एक फोटो अशाच जागेवरुन पोस्ट केला होता. शेवटच्या टेस्टची तयारी असं कॅप्शन देत त्याने हा फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोनंतर आता त्याने मॅचच्या एकदिवस अगोदर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

उद्यापासून अखेरची टेस्ट मॅच

मायकल वॉनने शेअर केलेला व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. उद्या म्हणजेच 4 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटची कसोटी मॅच खेळली जाईल. शेवटचा सामना भारताने 10 विकेट्सने जिंकला होता. हाच पराभव इंग्लंड संघाच्या जिव्हारी लागला आहे.

मोहम्मद सिराज की उमेश यादव, कुणाला मिळणार संधी?

भात विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात कुणाला संधी मिळेल, याची चर्चा सुरु झाली आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज किंवा उमेश यादव यांना (Mohammad Siraj or umesh yadav) शेवटच्या कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते.

खेळपट्टीचे रंग कसा असेल?

अहमदाबादस्थित नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळवण्यात येणाऱ्या सामन्यासाठी खेळपट्टी पुन्हा एकदा फिरकीला अनुकुल अशी आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटू पुन्हा एकदा जलवा दाखवण्यास सज्ज आहे. अशात संघात फारसे बदल न करता मोहम्मद सिराज किंवा उमेश यादव यांना अखेरच्या कसोटीत स्थान मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

हे ही वाचा :

Ind Vs Eng : शेवटच्या कसोटीत कुणाला संधी मिळणार? या 2 नावांची चर्चा, अशी असू शकते भारतीय प्लेईंग XI !

ना कार, ना बाईक, सामनावीर क्रिकेटपटूला ‘अमूल्य’ भेट, पाच लिटर पेट्रोल बक्षीस