AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : जिंकत नाही असं वाटत होतं तेवढ्यातच…; इंग्लंडविरुद्धचा सामना नक्की कुठे आणि कसा फिरला?

संजू सॅमसनच्या ८९ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अक्षर पटेलचा अफलातून झेल आणि बुमराह-हार्दिकच्या टिच्चून केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने थरारक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली आहे.

IND vs ENG : जिंकत नाही असं वाटत होतं तेवढ्यातच...; इंग्लंडविरुद्धचा सामना नक्की कुठे आणि कसा फिरला?
Axar Patel
| Updated on: Mar 06, 2026 | 10:42 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडवर मात केली. भारताने या विजयासह चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. भारताने इंग्लंडसमोर या सामन्यात 254 धावांचं लक्ष्य दिले होते. इंग्लंडने शेवटच्या बॉलपर्यंत याचा पाठलाग केला. मात्र केवळ 7 धावांनी इंग्लंडचा पराभव झाला आणि टीम इंडियाने थेट फायनलमध्ये धडक मारली. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये जेकब बेथल याच्या शतकी खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 246 धावा केल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने वानखेडेच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीचा पूर्ण फायदा उठवला. भारताच्या विजयाचा पाया संजू सॅमसनने रचला. त्याने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे सॅमसन १५ धावांवर असताना इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने त्याचा झेल सोडला आणि ती एक चूक इंग्लंडला प्रचंड महाग पडली. सॅमसनच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर २५४ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते.

याचा पाठलाग करताना इंग्लंडने भारताला कडवी झुंज दिली. मात्र, २० षटकांत इंग्लंडने ७ गडी गमावत २४६ धावांपर्यंतची मजल मारली. यावेळी भारतीय गोलंदाजांमध्ये काही उणिवा जाणत असल्या तरी क्षेत्ररक्षणाने हा सामना पूर्णपणे फिरवला. अक्षर पटेलने घेतलेला हॅरी ब्रूकचा डायव्हिंग कॅच सामन्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला. त्याशिवाय त्याने विल जॅक्स आणि फिल सॉल्टला बाद करण्यात मोलाची भूमिका बजावली.

भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना १८ व्या आणि १९ व्या षटकात पूर्णपणे फिरला. १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने अत्यंत अचूक गोलंदाजी करत केवळ ६ धावा दिल्या. त्यानंतर १९ व्या षटकात हार्दिक पंड्याने केवळ ९ धावा देत सॅम करनची महत्त्वाची विकेट घेतली. या दोन षटकांमुळे इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असणाऱ्या ३० धावा गाठणं कठीण झाले.

इतिहासाच्या उंबरठ्यावर भारत

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०२४ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून जेतेपद पटकावले होते. आता न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास भारत हा सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरेल. तसेच यजमान देश म्हणून विश्वचषक जिंकणारा पहिला संघ असेल. त्यामुळे आता अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय