AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : कॅच पकडूनही दिलं नॉटआऊट, भारत-पाक सामन्यात तूफान राडा ! काय घडलं ?

भारत वि . पाकिस्तानच्या सामन्यात नेहमीच काही ना काही राडा होत असतो, आणि यावेळेसही काही वेगळं घडलं नाही. अंपायरिंग वर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाले. भार. वि पाक सामन्यात मोठा राडाही झाला. नेमकं काय घडलं ?

IND vs PAK :  कॅच पकडूनही दिलं नॉटआऊट, भारत-पाक सामन्यात तूफान राडा ! काय घडलं ?
भारत वि. पाकिस्तान सामनाImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Nov 17, 2025 | 8:38 AM
Share

भारत वि. पाकिस्तान हे पारंपारिक शत्रु खेळाच्या मैदानावर एकमेकांसमो आले की काही ना काही वादन, राडा होणार हे ठरलेलं असतंत. एशिया कप रायझिंग स्टार 2025 टूर्नामेंटमध्ये इंडिया ए आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पुन्हा समोरासमोर आले. मात्र हा समान एकतर्फी अंदाजात संपला. या सामन्यात पाकिस्तानी संघाने भारतीय संघाचा 8 विकेट्सनी पराभव केला. मॅच जरी एकतर्फी झाली असली तरी या सामन्यातही बरेच विवाद पहायला मिळाले आणि अंपायर्सनी दिलेले काही निर्णयही वादात अडकले होते. मात्र सर्वात मोठा वाद झाला तो पाकिस्तानी फलंदाज माज सदाकतच्या कॅच बद्दल, ज्याला नॉट आऊट ठरवण्यात आलं. त्यानंतर सदाकतनेची पाकिस्तानला विजय मिळवून देणारी खेळी केली. मात्र या मॅचमध्ये मोठा राडा पहायला मिळाला.

कॅच पकडूनही नॉटआऊट

या सामन्यात भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 136 धावा केल्या. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज माझ सदाकतने स्फोटक फलंदाजी करत संघाला जलद सुरुवात करून दिली. त्याने फक्त 31 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केले. 50 धावा केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने एक साधा झेल सोडला तेव्हा माझ याला जीवनदान मिळाले. मात्र, दहाव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर तो पुन्हा बाद झाला. यावेळी, लाँग ऑनवर असलेल्या नेहल वधेराने बाऊंड्रीजवळ त्याचा कॅच टिपला. पण बाऊंड्री लाईन ओलांडण्यापूर्वी त्याने चेंडू दुसऱ्या फिल्डरकडे फेकला आणि कॅच पूर्ण केला.

त्यामुळे आपल्याला विकेट मिळाली असं टीम इंडियाला वाटलं, तेव्हा पाकिस्तानी फलंदाजही पॅव्हेलियनकडे परत जात होता आणि नवा बॅट्समन क्रीझवर आला. मात्र तेवढ्यातच अंपायरने सदाकत याला थांबवलं कारण तो कॅच योग्य होता की नाही ये थर्ड अंपायर चेक करत होते. अनेक वेळा रिप्ले झाल्यानंतर हे स्पष्ट झालं की वढेराने बाऊंड्री लाईनला स्पर्श न करताच, अगदी योग्य वेळेसच बाॉल दुसऱ्या फिल्डरला दिला होता, त्यामुळे फलंदाज अगदी स्पष्ट आऊट दिसत होता, मात्र थर्ड अंपायरने त्याला नॉट आऊट दिलं. हे पाहच भारतीय संघातील खेळाडू भडकले आणि त्यांनी अंपायरला घेरून या निर्णयावर प्रश्नांचा सरबत्ती केली. एवढंच नव्हे तर टीम इंडियाचा कोचिंग स्टाफही फोर्थ अंपायरशी चर्चा करत होता.

नव्या नियमामुळे बदलला निर्णय

माज सदाकत याला नॉट आऊट नेमकं का देण्यात आलं ? तसं पहायला गेलं तर अंपायरचा निर्णय अगदी योग्य होता, आणि त्याचं कारण म्हणजे नियमांत झालेला मोठा बदल. जून 2025 मध्ये ICCने नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या अनुषंगाने बाऊंड्री कॅचशी निगडीच नियमांमध्ये तीन बदल केले आणि येथे फक्त तिसरा नियम लागू होतो, जो ‘रिले कॅच’शी संबंधित आहे. यानुसार, जर एखाद्या फिल्डरने जर बाऊंड्री लाईन ओलांडण्याआधी बॉल दुसऱ्या फिल्डरकडे फेकला तर त्या फिल्डरला बॉल डेड होण्यापूर्वीच बाऊंड्री लाईनच्या आत यावं लागेल, तरच तो कॅच हा आऊट मानला जातो. तसं झालं नाही तर तो (फलंदाज) आऊट न होता, बाऊंड्री म्हणजेच 4 धावा दिल्या जातील.

View this post on Instagram

A post shared by ⚡ (@cric_explores)

याचा अर्थ असा की काल भारतीय संघाच्या नेहल वधेराने वेळेत चेंडू (बाऊंड्रीच्या आत) टाकला होता, परंतु दुसऱ्या खेळाडूने झेल घेण्यापूर्वी त्याला स्वतःला सीमारेषेवर परत यावे लागणार होते. मात्र कालवच्या केसमध्ये नेहल असं करायला विसरला आणि झेल पूर्ण झाला तेव्हा तो सीमारेषेबाहेर होता. परिणामी, अंपायरनी पाकिस्तानच्या बॅट्समनला नॉट आउट घोषित केले. मात्र भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना कॅचिंग नियमामधील या बदलाची माहिती नव्हती, ज्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला. पण त्याचा परिणाम असा झाला की या नियमाचा पाकिस्तानचा फायदा झाला आणि भारताला मोठा फटका बसला. पण अंपायरने आणखी एक चूक केली की त्यांनी बाऊंड्री ( 4 धावा) न देता एकही धाव दिली नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.