Shubman Gill : शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर? डॉक्टरांच्या त्या सूचनेमुळे वाढल्या अडचणी
कोलकाता कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिलला दुखापत झाली. पहिल्या डावात तो रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या डावातही तो खेळला नाही. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही त्याच्या सहभागाबद्दल प्रशचिन्ह उपस्थित झालं आहे.

भारतीय संघातील (Team India) अनेक खेळाडू दुखापतीमुळे त्रासले आहेत. गेल्या महिन्यात श्रेयस अय्यर जखमी होऊन बाहेर गेला तर आता भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्यामागे दुखपातीचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. त्यामुळेच शुबमनल गिल आता दुसऱ्या कसोटीतून बाहेर जाण्याचा निर्णय जवळपास निश्चित मानला जात आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरद्ध दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे, मात्र शुबमन हा टीम इंडिया सोबत जाणार नाहीये.
बंगाल क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी पीटीआयशी बोलतानाया गोष्टीची पुष्टी केली की, गिल गुवाहाटीला जाणार नाही. डॉक्टरांनी गिलला सध्या विमान प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच तो गुवाहाटीला जाणार नसून दुसऱ्या कसोटीतही खेळण्य़ाची शक्यता कमी आहे.
दुसरी टेस्ट महत्वाची पण गिलच्या सहभागावर सस्पेन्स कायम
कलकत्ता येथील पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर, दुसरी कसोटी टीम इंडियासाठी अतिय महत्त्वाची हे. गुवाहाटीतील बाराबती स्टेडियमवरील विजय मिळवणे, हाच मालिका पराभव टाळण्याचा एकमेव मार्ग आहे. पण त्या सामन्याला सुरूवात होण्यापूर्वीच टीम इंडियाच्या कॅप्टनच्या दुखापतीमुळे चिंता वाढली आहे.
आज होणार अंतिम निर्णय
पीटीआयच्या वृत्तानुसार, शुबमन गिल याल पुढचे चार दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या निर्णयामुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी संघासोबत गुवाहाटीला प्रवास करणे कठीण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, गिलची दुखापत दररोज तपासली जात आहे, किती बरी होत्ये, त्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्याच्या गुवाहाटीला जाण्याबाबत अंतिम निर्णय आज म्हणजेच मंगळवारी घेतला जाऊ शकतो.
कधी झाली दुखापत ?
कोलकाता कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिलला दुखापत झाली. 3 बॉलमध्ये 4 धाव वा काढत असताना त्याला दुखापत झाली आणि त्याच दुखापतीमुळे त्याला निवृत्त (रिटायर्ड हर्ट) होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. दुखापतीने त्रस्त असलेल्या गिलने दुसऱ्या डावातही फलंदाजी केली नाही.
