IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरने रचला इतिहास, T20I मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन, रोहित-कोहलीला सुद्धा नव्हतं जमलं
IND vs WI 1st T20 : वनडे मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने आता वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 सीरीजची सुद्धा तशीच सुरुवात केली आहे. पहिल्या टी20 मध्ये वेस्ट इंडिजवर दमदार विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा नायक ठरला श्रेयस अय्यर.

टीम इंडियाने काल वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने दिलेलं 172 धावांचं लक्ष्य भारतीय क्रिकेट संघाने अवघ्या 14.4 षटकात पूर्ण केलं. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला कॅप्टन श्रेयस अय्यर. श्रेयसने जबरदस्त बॅटिंग केली. त्याने 43 चेंडूत 102 धावा फटकावल्या. यात 10 फोर आणि 6 सिक्स होत्या. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा अक्षरश: त्याने पालापाचोळा केला. लखनऊच्या इकाना स्टेडिअवर ही मॅच झाली. श्रेयसने रोस्टन चेजच्या चेंडूवर सिक्स मारुन शतक पूर्ण केलं. त्याचवेळी त्याने इतिहास सुद्धा रचला. श्रेयसचे हे टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमधील पहिलं शतक आहेच. पण त्याचवेळी वेस्ट इंडिज विरुद्ध कुठल्याही भारतीय फलंदाजाने झळकवलेलं वेगवान शतक आहे. श्रेयस अय्यरचा रोहित आणि सूर्यकुमार यादवसह कर्णधार म्हणून भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवणाऱ्या खास्ट लिस्टमध्ये समावेश झाला आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून शतक झळकवणारा रोहित शर्मा पहिला भारतीय आहे. 2017 साली श्रीलंकेविरुद्ध त्याने अशी कामगिरी केली होती. 2023 साली सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कॅप्टन म्हणून शतक झळकवलं होतं. रोहित आणि सूर्याने पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकवलं होतं. अय्यर धावाचा पाठलाग करताना शतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना कुठल्याही भारतीय कर्णधाराची सर्वाधिक धावसंख्या 94 होती. विराट कोहलीने 2019 साली हैदराबादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच या धावा केल्या होत्या.
टॉस कोणी जिंकला?
वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टी20 सामना 8 विकेटने जिंकून टीम इंडियाने पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने टॉस गमावला. पहिली बॅटिंग करताना त्यांनी 19.1 ओव्हर्समध्ये 171 धावा केल्या. कॅप्टन शाई होपने कामिल पूरणसह पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. कामिल 12 रन्स बनवून आऊट झाले. होपने 37 चेंडूत 2 सिक्स आणि 6 फोरसह 52 धावा केल्या. होपने शेरफन रूदरफोर्डसह चौथ्या विकेटसाठी 35 चेंडूत 63 धावा जोडल्या.
भारतीय कॅप्टन म्हणून T20I शतक
121* – रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, बंगळुरु 2024
118 – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर 2017
111* – रोहित शर्मा विरुद्ध वेस्टइंडीज़, लखनऊ 2018
102* – श्रेयस अय्यर विरुद्ध वेस्टइंडीज़, लखनऊ 2026
100 – सूर्यकुमार यादव विरुद्ध दक्षिण अफ्रीका, जोहान्सबर्ग 2023
