IndvsWI : शून्यावर बाद होऊनही कोहलीच्या नावे नवा विक्रम

IndvsWI : शून्यावर बाद होऊनही कोहलीच्या नावे नवा विक्रम

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या चेंडूवर बाद झाला. मात्र, आजच्या सामन्यात एकही धाव न काढता देखील कोहलीने एक विक्रम आपल्या नावे केला आहे

Nupur Chilkulwar

|

Dec 18, 2019 | 11:55 PM

( India vs West Indies ODI) विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या चेंडूवर बाद झाला. मात्र, या सामन्यात एकही धाव न काढता देखील कोहलीने एक विक्रम आपल्या नावे केला आहे (Virat Kohli New Record). कर्णधार विराट कोहली हा 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भारताचा आठवा आणि जगातील 33 वा खेळाडू बनला आहे. विशाखापट्टणमच्या एसीए-वीडीसीए क्रिकेट मैदानावर बुधवारी (18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या वन डे सामन्यात कोहलीने ही कामगिरी केली (India vs West Indies ODI).

2008 मध्ये श्रीलंका विरुद्धच्या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने आतापर्यंत 241 वन डे, 84 कसोटी आणि 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

यापूर्वी सचिन तेंदुलकरने 664, महेंद्र सिंह धोनीने 538, राहुल द्रविडने 509, मोहम्मद अझहरुद्दीनने 433, सौरभ गांगुलीने 424, अनिल कुंबलेने 403 आणि युवराज सिंहने 402 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या यादीत 400 सामने खेळून कोहलीने आठवं स्थान मिळवलं आहे.

भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय 

दुसऱ्या वन डे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. भारताने वेस्ट इंडिजला 107 धावांनी पराभूत केलं. भारताच्या गोलंदाजांनी कमालीचा खेळ दाखवत वेस्ट इंडिजला 43.3 षटकातच गुंडाळलं. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे आता येत्या 22 डिसेंबरला होणारा तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे.

रोहित शर्माचं (Rohit Sharma) दीडशतक आणि के एल राहुलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजसमोर 388 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. रोहित शर्माच्या 159 धावा तर राहुलच्या 102 धावांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 5 बाद 387 धावा ठोकल्या. कर्णधार विराट कोहलीला दुसऱ्या वन डे सामन्यात एकही धाव करता आली नाही. पोलार्डने त्याला आल्या पावली माघारी धाड़लं. पहिल्याच चेंडूवर कोहली बाद झाला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें