AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND sv WI: विडिंजविरुद्ध मॅच गमावली तरीही श्रेयसला कसलाच फरक पडला नाही, उलट खेळाडूंचे केलं कौतुक

Shreyas Iyer On Team India Loss: भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा टी-२० सामना रंगला जो भारतीय संघाने गमावला, यानंतरही कर्णधार श्रेयस अय्यरला संघातील खेळाडूंचे प्रचंड कौतुक आहे.

IND sv WI: विडिंजविरुद्ध मॅच गमावली तरीही श्रेयसला कसलाच फरक पडला नाही, उलट खेळाडूंचे केलं कौतुक
| Updated on: Oct 10, 2026 | 7:42 AM
Share

IND vs WI 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना भारतीय संघाने गमावला. भारतीय संघाकडून हवी तशी गोलंदाजी झाली नाही. केवळ एका गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. आता या सामन्यातील पराभवानंतरही कर्णधार श्रेयस अय्यर प्रचड खूश आहे.

खेळपट्टीची स्थिती पाहता किती धावा पुरेशा ठरल्या असत्या, या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, “खरं सांगायचं तर, तुम्ही कोणताही विशिष्ट आकडा सांगू शकत नाही. जेव्हा दव पडायला लागतं, तेव्हा त्याचा खूप मोठा परिणाम होतो. २४९ धावांचे लक्ष्य दोन षटके शिल्लक असतानाच पूर्ण झाले. त्यामुळे, आपण किती धावा करायला हव्यात याचा कोणताही आकडा किंवा पूर्वअंदाज लावू शकत नाही.”

सामन्यादरम्यान, भारतीय संघाला आणखी एका गोलंदाजाची उणीव भासत होती. या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, “चुकीला फारच कमी वाव होता. जर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला चेंडू चुकला असता, तर तो थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला असता. संपूर्ण सामन्यात ते किती चांगली फलंदाजी करत होते हे तुम्ही पाहिलंच. आम्ही काही संधी गमावल्या. पण हा खेळाचाच एक भाग आहे. जिथे त्यांचे श्रेय आहे, तिथे ते दिलेच पाहिजे. ते अप्रतिम फलंदाजी करुन गेले. ज्यासाठी ते सर्व श्रेयास पात्र आहेत.”

दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाला निश्चितच पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, सामन्यादरम्यान सॅमसन आणि मयंक यादव यांची कामगिरी कौतुकास्पद होती. या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य करताना श्रेयस अय्यर म्हणाला, “दोन्ही खेळाडूंनी आपापल्या विभागात उत्कृष्ट कामगिरी केली. आम्ही संजू आणि अभिषेककडून वेळोवेळी अशाच कामगिरीची अपेक्षा करतो. ज्या प्रकारे ते खेळत आहेत आणि जबाबदारी घेत आहेत ते अप्रतिम आहे. मयंकनेही उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या तीन विकेट्समुळे आम्ही सामन्यात टिकून राहिलो. पण त्यानंतर एक भागीदारी झाली आणि सामन्याची गती पूर्णपणे त्यांच्या बाजूने वळली.”

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर