AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: मॅचनंतर श्रेयस अय्यरकडून तिघांचे भरभरुन कौतुक, पण मॅचविनरच्या नावाचा उल्लेखही नाही

Shreyas Iyer On Team India: भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामना जिंकल्यानंतर तीन खेळाडूंचे कौतुक केले पण एका मॅचविनरचे नाव घ्यायला विसरला.

IND vs WI: मॅचनंतर श्रेयस अय्यरकडून तिघांचे भरभरुन कौतुक, पण मॅचविनरच्या नावाचा उल्लेखही नाही
| Updated on: Oct 12, 2026 | 7:44 AM
Share

IND vs WI 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले. तिसरा सामना काल पार पडला जो भारतीय संघाने जिंकला. मालिकेत आता भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. आता तिसरा सामना जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहा…

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजयानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर  म्हणाला, “सामन्यादरम्यान गोलंदाजांना इतक्या आत्मविश्वासाने खेळताना पाहून खूप आनंद झाला. जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो, तेव्हा त्यांची मानसिकता स्पष्ट होती. ते आव्हानासाठी पूर्णपणे तयार होते, आणि आम्हाला नेमके हेच हवे होते. अभिषेकने शानदार सुरुवात केली. त्यानंतर ईशान मैदानात आला आणि त्याने आल्याबरोबरच गोलंदाजांवर हल्ला चढवला. गेल्या काही महिन्यांतील त्याची कामगिरी खरोखरच प्रभावी राहिली आहे. प्रिन्सनेही खालच्या फळीत फलंदाजीला येऊन महत्त्वपूर्ण धावा केल्या.” तीन विकेट काढणाऱ्या अर्शदीप सिंगचे कौतुक करायला श्रेयस विसरुन गेला.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंदूरमध्ये नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत सर्व गडी गमावून २२३ धावा केल्या. डावाची सुरुवात करताना अभिषेक शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ३० चेंडूंमध्ये ६९ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. इशान किशनने ३७ धावांचे, तर तिलक वर्माने २८ धावांचे योगदान दिले. नितीश कुमार रेड्डीने १४ चेंडूंमध्ये २१ धावा आणि अक्षर पटेलने १४ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला.

भारताच्या २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजचा संघ २० षटकांत सात गडी गमावून केवळ २०९ धावांपर्यंतच पोहोचू शकला. शिमरॉन हेटमायरने २६ चेंडूंमध्ये महत्त्वपूर्ण ४३ धावा आणि कामिल पूरनने २७ चेंडूंमध्ये महत्त्वपूर्ण ४२ धावा केल्या. ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. या फलंदाजांव्यतिरिक्त, शमर स्प्रिंगरने ११ चेंडूंमध्ये नाबाद ३५ धावा आणि शेर्फेन रदरफोर्डने २० चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या.

वेस्ट इंडीजकडून रॉस्टन चेस, शमर जोसेफ आणि शमर स्प्रिंगर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. कीमो पॉल आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर नमन धीरने दोन आणि अक्षर पटेल व नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ