IPL 2025 : करोडोंचा खेळ, पण मैदानात फेल! फ्लॉप इलेव्हनमधील त्या खेळाडूंच्या अपयशाची कहाणी, मालकाच्या अपेक्षेवर फेरले पाणी
IPL Flop Eleven Players : IPL 2025 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी काही खेळाडूंची जोरदार हवा होती. त्यातील काहींना तर 25 कोटींहून अधिक किंमत मोजून खरेदी करण्यात आले होते. पण हा करोडोंचा खेळ मालकांच्या जीवाशी आला आहे. हे खेळाडू मैदानात फ्लॉप ठरले.

IPL 2025 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी काही खेळाडू प्रकाशझोतात होते. त्यांना विविध संघाच्या मालकांनी लिलावात महागडे दाम मोजून खरेदी केले होते. हे खेळाडू मोठा करिष्मा करणार, ते मैदान गाजवणार असे वाटत होते. कोटींची उड्डाण घेणार्या या खेळाडूंना आतापर्यंत खास कामगिरी बजावता आलेली नाही. या आयपीएलच्या हंगामात त्यांना कमाल दाखवता आलेली नाही. या खेळाडूंनी संघ मालकांच्याच नाही तर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर सुद्धा पाणी फेरले.
आयपीएल 2025 चा फ्लॉप इलेव्हन संघ
1. रचिन रवींद्र (चेन्नई सुपर किंग्स)




या खेळाडूने ८ सामन्यांत केवळ १९१ धावा केल्या. त्याची सरासरी २७.२९ आणि स्ट्राईक रेट १२८.१ इतका आहे. सुरुवातीपासूनच त्याच्या खेळण्यात सातत्याचा अभाव दिसला. त्याला चेन्नई सुपर किंग्सने ४ कोटी रुपयांत खरेदी केल्याची माहिती आहे.
2. राहुल त्रिपाठी (चेन्नई सुपर किंग्स)
हा दुसरा खेळाडू सुद्धा चेन्नई सुपर किंग्सचा आहे. राहुलने ५ डावांत केवळ ५५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ११ आणि स्ट्राईक रेट ९७ इतका आहे. त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक आणि सुमार आहे. त्याला संघाने ३.४ कोटी रुपयांत खरेदी केले होते.
3. वेंकटेश अय्यर (कोलकाता नाईट रायडर्स)
वेंकटेश अय्यरला आयपीएलमध्ये कमाल दाखवता आलेली नाही. त्याने ८ सामन्यांत १३५ धावा केल्या. त्याची सरासरी २२.५०. स्ट्राईक रेट चांगला आहे. पण त्याला कमाल दाखवता आली नाही. अय्यरला कोलकत्ताच्या मालकाने २३.७५ कोटीत खरेदी केले होते.
4. ऋषभ पंत (लखनऊ सुपर जायंट्स) – कर्णधार आणि यष्टिरक्षक
आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी पंतची एकदम हवा होती. तो करिष्मा दाखवणार असा दावा करण्यात येत होता. त्याला संघाने २७ कोटींची बोली लावून खरेदी केले होते. पण त्याने ९ सामन्यात केवळ १०६ धावा केल्या. सरासरी १३.२५, स्ट्राईक रेट ९६.३६ सह त्याने सर्वांच्याच अपेक्षांवर पाणी फेरले.
5. रिंकू सिंग (कोलकाता नाईट रायडर्स)
रिंकूला कोलकत्ता संघाने 55 लाखात, लिलावापूर्वीच संघात कायम ठेवले होते. त्याने ८ सामन्यांत १३३ धावा केल्या. सरासरी ३३.२५. स्ट्राईक रेट चांगला असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हते.
6. ग्लेन मॅक्सवेल (पंजाब किंग्स)
मॅक्सवेलला संघाने ४.२ कोटी रुपयांत खरेदी केले. ६ सामन्यांत त्याने केवळ ४८ धावा आणि ४ बळी घेतले. दुखापतीमुळे हंगाम अर्धवट राहिला. त्याला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही.
7. रवींद्र जडेजा (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नई संघाने जडेजाला बोलीपूर्वीच १६ कोटी रुपये देऊन कायम केले होते. पण त्यालाही मोठी कामगिरी बजावता आली नाही. ९ सामन्यांत त्याने ६ बळी घेतले. गोलंदाजी सरासरी ३१.३३ इतकी आहे. फलंदाजीतही त्याला सूर गवसलेला नाही.
8. मोहम्मद शमी (सनरायझर्स हैदराबाद)
शमीच्या विश्वचषकातील कामगिरीचा प्रभाव दिसून आला. सररायझर्सने त्याला १० कोटी रुपये देऊन खरेदी केले. पण त्याला ८ सामन्यांत केवळ ६ बळी घेता आले.
9. तुषार देशपांडे (राजस्थान रॉयल्स)
संघाने तुषार याला ६.५ कोटी रुपयांत खरेदी केले. त्याला पण प्रभावी कामगिरी दाखवता आली नाही. त्याने ८ सामन्यांत ६ बळी घेतले.
10. सुनील नरेन (कोलकाता नाईट रायडर्स)
नरेन याला १२.५ कोटी रुपयांत खरेदी केले. त्याने ७ सामन्यांत ७ बळी घेतले. त्याची पूर्वीची जादू हिरवली. त्याची प्रभावी गोलंदाजी दिसून आली नाही.
11. मथीशा पथिराना (चेन्नई सुपर किंग्स)
लिलावापूर्वीच २ कोटी निश्चित करून मथीशाला चेन्नईने थांबवले. पण त्याचा संघाला फारसा उपयोग झाला नाही. ७ सामन्यांत त्याने केवळ ७ बळी घेतले. त्याला धावांना रोखता आले नाही.