AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : कोहलची ‘विराट’ बॅटींग अन् भुवनेश्वर कुमारची बॉंलिंग ‘रंग लाई’ अफगाणिस्तानचा सुफडा-साफ

एकीकडे भारतीय संघाने 212 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यामुळे अफगाणिस्तानला किमान सुरवात चांगली करणे गरजेचे होते. पण पहिल्याच ओव्हरमध्ये हज्रातुल्लाह जझईची विकेट मिळवण्यास भारतीय फलंदाजांना यश आले. त्यानंतर लागलेली गळती कोणताच फलंदाज रोखू शकला नाही. दुसरीकडे इब्राहिम झद्रान याने टिकून राहण्याचा प्रयत्न केला पण दुसरीकडून त्याला कुणाचीच साथ मिळाली नाही.

Asia Cup : कोहलची 'विराट' बॅटींग अन् भुवनेश्वर कुमारची बॉंलिंग 'रंग लाई' अफगाणिस्तानचा सुफडा-साफ
अफगाणिस्तान बरोबरच्या. सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला.
| Updated on: Sep 08, 2022 | 10:39 PM
Share

दुबई :  (Asia Cup )अशिया कप स्पर्धेच्या फायनलपर्यंत (India Team) भारत मजल मारु शकणार नाही हे अगोदरच स्पष्ट झाले आहे. पण अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याने भारतीय टीम बरेच काही दिले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ओपनर असलेल्या (Virat Kohli) विराट कोहलीला आपला फॉर्म याच सामन्यामुळे परत मिळाला आहे. तर गोलंदाजामध्येही एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. विराट कोहलीच्या विस्फोटक फलंदाजीनंतर भारतीय टीमचा विजय होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते पण गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांचा सुफडा-साफच केला. दुसऱ्या इंनिंगच्या पहिल्या बॉलपासून भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांची कोंडी केली. शिवाय 212 धावांचा डोंगर आणि खराब सुरवात यामुळे दबावात असलेल्या अफगाणिस्तान फलंदाजांच्या धडाधड विकेट पडल्या. 7 विकेटच्या बदल्यात 57 रन अशी केवीलवाणी अवस्था अफगाणिस्तानच्या टीमची झाली होती. भारतीय संघाकडून फलंदाजीमध्ये विराट कोहलीने 61 बॉलमध्ये 122 धावा केल्या तर गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमारने चार ओव्हरमध्ये 4 धावा देऊन 5 फलंदाजांना बाद केले होते.

21 धावांमध्ये 6 फलंदाज बाद

एकीकडे भारतीय संघाने 212 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यामुळे अफगाणिस्तानला किमान सुरवात चांगली करणे गरजेचे होते. पण पहिल्याच ओव्हरमध्ये हज्रातुल्लाह जझईची विकेट मिळवण्यास भारतीय फलंदाजांना यश आले. त्यानंतर लागलेली गळती कोणताच फलंदाज रोखू शकला नाही. दुसरीकडे इब्राहिम झद्रान याने टिकून राहण्याचा प्रयत्न केला पण दुसरीकडून त्याला कुणाचीच साथ मिळाली नाही. 21 धावानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी स्क्रीज टिकून राहण्यासच पसंती दिली.

भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट कामगिरी

विराटच्या बॅटींगनंतर सामन्याला विजयाची मोहर लावण्याचे काम खऱ्या अर्थाने भारतीय गोलंदाजांनी केले. पहिल्याच ओव्हरपासून अफगाणी फलंदाजांना पॅक केल्याने धावांच्या शोधात झटपट विकेट गेल्या. भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीपुढे एकही फलंदाज टिकू शकला नाही. त्यामुळे 101 धावांच्या फरकाने टीम इंडियाचा विजय झाला.

मॅचमधील महत्वाच्या बाबी

अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती तर कर्णधाराची धुरा ही केएल राहुलच्या खांद्यावर होती. यापूर्वीच्या सामन्यात शून्यावर बाद झालेला विराट या सामन्यात काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सुरवात सावध पण शेवटी धमाकेदार बॅटींग करीत विराटने तब्बल 1021 दिवसांनतर आपले 71 वे शतक पूर्ण केले. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनीही अफगाणी फलंदाजांनी असमान दाखवले. सुरवातीपासून भेदक मारा केल्याने 21 रनावर 6 विकेट अशी अवस्था अफगाणिस्तानची होती. त्यामुळे भारतीय संघाचा 101 धावांनी विजय झाला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.