IPL 2020 FINAL, MI vs DC : दिल्लीविरुद्ध मैदानात उतरताच ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा भीम पराक्रम

रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावून दिलं आहे.

IPL 2020 FINAL, MI vs DC : दिल्लीविरुद्ध मैदानात उतरताच 'हिटमॅन' रोहित शर्माचा भीम पराक्रम

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. हा अंतिम सामना (IPL FINAL 2020) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉससाठी मैदानात येताच मुंबईचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) एक भीम पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो दुसराच खेळाडू ठरला आहे. ipl 2020 final mi vs dc mumbai indians captain hitman rohit sharma became the second player to play 200 matches in ipl history

काय आहे पराक्रम?

रोहित शर्माचा दिल्ली विरुद्धातील हा अंतिम सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो दुसराच खेळाडू ठरला आहे. याआधी अशी कामगिरी या मोसमात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केली.

रोहितची आयपीएल कारकिर्द

रोहितने आयपीएलच्या एकूण 199 सामन्यात 130.58 च्या स्ट्राईक रेटने आणि 31.09 च्या सरासरीने 5 हजार 162 धावा केल्या आहेत. तसेच रोहितने आतापर्यंत एकदा शतक आणि 38 वेळा अर्धशतकं लगावली आहेत. नाबाद 106 धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रोहित पाचव्या क्रमांकावर आहे.

रोहितने बोलिंग करतानाही 15 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे रोहितने 2009 मध्ये म्हणजेच आयपीएलच्या 2 ऱ्या मोसमात हॅट्रिक घेण्याची कामगिरीही केली आहे. तेव्हा रोहित हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता. म्हणजेच हैदराबादसाठी खेळत होता. तेव्हा त्याने मुंबईच्या अभिषेक नायर, हरभजन सिंह आणि जेपी ड्युमिनी या 3 फलंदाजांना बाद करत हॅट्रिक घेतली होती.

यशस्वी खेळाडू आणि कर्णधार

आयपीएलमध्ये रोहित शर्मा सर्वात यशस्वी खेळाडू आणि कर्णधार राहिला आहे. रोहितने आतापर्यंत एकूण 5 वेळा खेळाडू म्हणून अंतिम सामना खेळला आहे. यामध्ये 5 ही वेळा तो अंतिम सामना जिंकला आहे. रोहित 2009 मध्ये हैदराबादकडून खेळत होता. त्यावेळेस अंतिम सामना हैदराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळण्यात आली. या अंतिम सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर 6 धावांनी मात केली होती. तर त्यानंतर 2013, 2015, 2017 आणि 2019 अशा 4 वेळा रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला विजेतेपद मिळवून देण्याची कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 Final MI vs DC : मुंबईच्या शिलेदारांचं पारडं जड, पाचव्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी

Photo | MI Vs DC आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईचं पारडं जड करणाऱ्या 5 गोष्टी

IPL 2020, CSK vs RR : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीचे भन्नाट ‘द्विशतक’, ठरला आयपीएलमधील पहिला खेळाडू

ipl 2020 final mi vs dc mumbai indians captain hitman rohit sharma became the second player to play 200 matches in ipl history

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI