IPL 2020, KXIP vs SRH : पंजाबच्या गोलंदाजांची कमाल, हैदराबादवर 12 धावांनी मात

यंदाच्या मोसमातील किंग्जस इलेव्हन पंजाबचा हा सलग चौथा विजय ठरला.

IPL 2020, KXIP vs SRH : पंजाबच्या गोलंदाजांची कमाल, हैदराबादवर 12 धावांनी मात
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 12:19 AM

दुबई : किंग्जस इलेव्हन पंजाबने सनरायजर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला आहे. पंजाबने हैदराबादला विजयासाठी 127 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादचा डाव 19.5 ओव्हरमध्ये  114 धावांवरच गुंडाळला. पंजाबच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या फलंदाजांना नीट खेळता आले नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक गोलंदाजी करत पंजाबला 114 धावांवर रोखले. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 35 तर विजय शंकरने 26 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि ख्रिस जॉर्डन या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी. मुर्गन आश्विन आणि रवी बिश्नोई या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट टीपत अर्शदीप आणि ख्रिसला चांगली साथ दिली.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने 56 धावांची भागीदारी केली. हैदराबादला पहिला धक्का 56 धावांवर बसला. वॉर्नर 35 रन्सवर आऊट झाला. यानंतर हैदराबादने दुसरी आणि तिसरी विकेट झटपट गमावली. त्यामुळे हैदराबादची 67-3 अशी परिस्थिती झाली.

मात्र यानंतर मनिष पांडे आणि विजय शकंरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ख्रिस जॉर्डनने मनिष पांडेला 15 धावांवर आऊट केलं. यानंतर हैदराबादने पंजाबच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातलं. हैदराबादने एकामागोमाग एक विकेट गमावले. हैदराबादच्या 3 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. दरम्यान हैदराबादचा पराभव करत पंजाबचा हा यंदाच्या मोसमातील सलग चौथा विजय ठरला.

दरम्यान त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडले. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 126 धावा केल्या. पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक नाबाद 32 धावा केल्या. तर त्यानंतर कर्णधार लोकेश राहुलने 27 रन्स केल्या. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि रशिद खानने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

बॅटिंगसाठी आलेल्या पंजाबची चांगली सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पंजाबने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. पंजाबला पहिला धक्का 37 धावांवर लागला. मनदीप सिंह 17 धावांवर बाद झाला. यानंतर ख्रिस गेल 20 धावा करुन माघारी परतला. गेलनंतर कर्णधार लोकेश राहुल आऊट झाला. त्याने 27 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने आजही निराशा केली. मॅक्सवेल 12 धावांवर तंबूत परतला. दीपक हुड्डा भोपळा न फोडताच बाद झाला. ख्रिस जॉर्डन 7 धावांवर आऊट झाला. मुर्गन आश्विन 4 रन्सवर धावबाद झाला. पंजाबकडून निकोलस पूरनने एकाकी झुंज दिली. त्याने 28 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. यात त्याने 2 फोर लगावले. IPL 2020 KXIP vs SRH Live Score Update Today Cricket Match Kings Eleven Punjab vs Sunrisers Hyderabad Live  स्कोअरकार्ड

[svt-event title=”पंजाबची हैदराबादवर 12 धावांनी मात” date=”24/10/2020,11:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला नववा धक्का” date=”24/10/2020,11:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला आठवा धक्का” date=”24/10/2020,11:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता” date=”24/10/2020,11:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला सातवा धक्का” date=”24/10/2020,11:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला सहावा धक्का” date=”24/10/2020,11:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूत 17 धावांची आवश्यकता” date=”24/10/2020,11:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पाचवा धक्का” date=”24/10/2020,11:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता” date=”24/10/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला चौथा धक्का” date=”24/10/2020,11:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 28 धावांची आवश्यकता” date=”24/10/2020,11:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता” date=”24/10/2020,10:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 12 ओव्हरनंतर” date=”24/10/2020,10:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची तिसरी विकेट” date=”24/10/2020,10:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला दुसरा धक्का” date=”24/10/2020,10:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 7 ओव्हरनंतर” date=”24/10/2020,10:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पहिला धक्का” date=”24/10/2020,10:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची शानदार सुरुवात” date=”24/10/2020,10:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 3 ओव्हरनंतर” date=”24/10/2020,9:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबाद 1 ओव्हरनंतर” date=”24/10/2020,9:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात” date=”24/10/2020,9:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 127 धावांचे आव्हान” date=”24/10/2020,9:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला 7 वा धक्का” date=”24/10/2020,9:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 18 ओव्हरनंतर” date=”24/10/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला सहावा धक्का” date=”24/10/2020,9:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबच्या 100 धावा पूर्ण” date=”24/10/2020,9:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 16 ओव्हरनंतर” date=”24/10/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला पाचवा धक्का” date=”24/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला चौथा झटका” date=”24/10/2020,8:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”13 ओव्हरनंतर पंजाब” date=”24/10/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला तिसरा झटका” date=”24/10/2020,8:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला दुसरा धक्का” date=”24/10/2020,8:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 9 ओव्हरनंतर” date=”24/10/2020,8:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर पंजाब” date=”24/10/2020,8:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला पहिला धक्का” date=”24/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”2 ओव्हरनंतर पंजाब” date=”24/10/2020,7:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात” date=”24/10/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”24/10/2020,7:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचे अंतिम 11 खेळाडू” date=”24/10/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे अंतिम 11 खेळाडू” date=”24/10/2020,7:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादने टॉस जिंकला” date=”24/10/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

पॉइंट्सटेबलमध्ये हैदराबाद आणि पंजाब अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांनी 10 सामन्यातून 4 सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाब गेल्या काही सामन्यांपासून दमदार कामगिरी करत आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा सामना कोणता संघ जिंकणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हैदराबाद पंजाबवर वरचढ

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत हैदराबाद आणि पंजाब यांच्यात एकूण 15 सामने (2013-2020) खेळण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद पंजाबवर वरचढ राहिली आहे. हैदराबादने 15 पैकी 11 सामन्यात पंजाबला पराभवाची धूळ चारली आहे. तर पंजाबला केवळ 4 सामनेच जिंकता आले आहेत. या मोसमातील याआधीच्या सामन्यात हैदराबादने पंजाबचा 69 धावांनी पराभव केला होता.

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.

किंग्जस इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत बरार, ईशान पोरेल, मनदीप सिंह, जेम्स निशाम, तजिंदर सिंह, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हुड्डा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉट्रेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नालकंडे, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदीश सुचित, कृष्णप्पा गौतम, हार्डस विलजेन आणि सिमरन सिंह.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs KXIP : पंजाबचा सलग चौथा पराभव, सनरायजर्स हैदराबादची 69 धावांनी मात

IPL 2020 KXIP vs SRH Live Score Update Today Cricket Match Kings Eleven Punjab vs Sunrisers Hyderabad Live

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.