IPL 2020 Final MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची आयपीएल फायनल सामन्यांमधील कामगिरी

रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावून दिलं आहे.

IPL 2020 Final MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची आयपीएल फायनल सामन्यांमधील कामगिरी

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) अंतिम सामना आज (10 नोव्हेंबर) खेळण्यात येणार आहे. हा अंतिम सामना (IPL FINAL 2020) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळण्यात येणार आहे. रोहित शर्मा हा आयपीएमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे. रोहित शर्माची आयपीएलच्या अंतिम सामन्यात कर्णधार म्हणून खेळण्याची ही पाचवी तर खेळाडू म्हणून सहावी वेळ आहे. रोहित 2009 मध्ये हैदराबादकडून एक खेळाडू म्हणून खेळत होता. यावेळेस हैदराबादने अंतिम सामन्यात बंगळुरुचा पराभव केला होता. तसेच रोहितने आपल्या नेतृत्वात 4 वेळा मुंबईला आयपीएल विजेतपद मिळवून दिलं आहे. या हिशोबाने अंतिम सामन्यात एक कर्णधार या नात्याने रोहितची ही 5 वी तर खेळाडू म्हणून 6 वी वेळ आहे. या निमित्ताने आपण रोहित शर्माची या महत्वाच्या सामन्यांमधील कामगिरी पाहणार आहोत. ipl 2020 mi vs dc hitman rohit sharma performance in the ipl final match

आयपीएल फायनल 2009

आयपीएलच्या दुसऱ्या पर्वातील अंतिम सामना हैदाराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला होता. या सामन्यात रोहितने 24 धावा केल्या होत्या. या अंतिम सामन्यात हैदाराबादने बंगळुरुचा पराभव केला होता. यानंतर रोहित शर्माने 2013, 2015, 2017 आणि 2019 अशा एका वर्षाच्या अंतराने आपल्या नेतृत्वात मुंबईला अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला. रोहितची या 4 मोसमातील कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात केलेली कामगिरी पाहुयात.

आयपीएल फायनल 2013

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस यांच्यात 2013 मध्ये अंतिम सामना खेळण्यात आला. या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. या मॅचमध्ये रोहित अवघ्या 2 धावा करुन माघारी परतला होता. या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईचा 23 धावांनी पराभव केला होता.

आयपीएल फायनल 2015

यावेळेसही मुंबई विरुद्ध चेन्नई या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये फायनल खेळण्यात आली. चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडले. या सामन्यात रोहितने 26 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह अर्धशतकी खेळी केली होती. मुंबईने यावेळेस चेन्नईवर 41 धावांनी विजय मिळवला होता.

आयपीएल फायनल 2017

आयपीएलच्या 10 व्या मोसमात म्हणजेच 2017 ची फायनल मॅच मुंबई विरुद्ध पुणे या संघात खेळण्यात आली होती. या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. या सामन्यात रोहितने 24 धावा केल्या होत्या. ही मॅच लो स्कोअरिंग झाली होती. मुंबईने पुण्याला विजयासाठी 129 धावांचे आव्हान दिले होते. मात्र अटीतटीच्या सामन्यात मुंबईने पुण्याचा 1 धावेने पराभव करत जेतेपद पटकावलं होतं.

आयपीएल फायनल 2019

आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबईची 4 वर्षाने गाठ पडली. मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये रोहितने 15 धावा केल्या. हा अंतिम सामना अगदी चुरशीचा झाला होता. मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईने चेन्नईला 148 धावावंर रोखले. त्यामुळे या अंतिम सामन्यातही मुंबईने चेन्नईवर 1 धावेने विजय मिळवला होता.

अशा प्रकारे रोहितने एकूण 5 अंतिम सामन्यात अनुक्रमे 24, 2, 50, 24, 15 अशा एकूण 115 धावा केल्या आहेत. रोहितला अंतिम सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आजच्या या अंतिम सामन्यात रोहितकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

भीम पराक्रमापासून 1 पाउल दूर

रोहित शर्माचा दिल्ली विरुद्धातील हा अंतिम सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना असणार आहे. रोहित टॉससाठी मैदानात उतरताच त्याच्या नावावर या भीम पराक्रमाची नोंद होणार आहे. अशी कामगिरी करणारा तो दुसराच खेळाडू असणार आहे. याआधी अशी कामगिरी या मोसमात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केली.

रोहितची आयपीएल कारकिर्द

रोहितने आयपीएलच्या एकूण 199 सामन्यात 130.58 च्या स्ट्राईक रेटने आणि 31.09 च्या सरासरीने 5 हजार 162 धावा केल्या आहेत. तसेच रोहितने आतापर्यंत एकदा शतक आणि 38 वेळा अर्धशतकं लगावली आहेत. नाबाद 106 धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रोहित पाचव्या क्रमांकावर आहे.

IPL 2020 Final MI vs DC : मुंबईच्या शिलेदारांचं पारडं जड, पाचव्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी

Photo | MI Vs DC आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईचं पारडं जड करणाऱ्या 5 गोष्टी

ipl 2020 mi vs dc hitman rohit sharma performance in the ipl final match

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI