IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : डेव्हिड वॉर्नरचा आनंद गगनात मावेना, बंगळुरुवरील विजयाचं रहस्य उलगडलं

सनरायजर्स हैदराबादचा हा सलग चौथा विजय ठरला.

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : डेव्हिड वॉर्नरचा आनंद गगनात मावेना, बंगळुरुवरील विजयाचं रहस्य उलगडलं
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 6:08 PM

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील एलिमिनेटर (Eliminator 2020) सामन्यात सनराजयर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने क्वालिफायर 2 सामन्यात धडक मारली. तर बंगळुरुचे आव्हान संपुष्टात आलं आहे. हैदराबादचा हा सलग चौथा विजय ठरला. हैदराबादच्या या विजयावर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आनंद व्यक्त केला आहे. तसेच हैदराबादच्या विजयाचं रहस्यही उलगडलं आहे. ipl 2020 srh vs rcb eliminator hyderabad beats bangalore by 6 wickets captain david warner happy after victory reveals secret of hyderabad

वॉर्नर काय म्हणाला?

“विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची 64-4 अशी स्थिती झाली. त्यामुळे हैदराबादचा संघ अडचणीत सापडला. मात्र केन विल्यम्सनने (Kane Williamson) हैदराबादचा डाव सावरला. विल्यम्सन आमचा स्टार खेळाडू आहे. केनने दबावात्मक परिस्थितीत उभा राहत नाबाद विजयी अर्धशतकी खेळी केली”, अशा शब्दात केनच्या या खेळीचं वॉर्नरने कौतुक केलं.

बंगळुरने प्रथम बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 131 धावा केल्या. यामुळे हैदराबादला विजयासाठी 132 धावांचे आव्हान मिळाले. मात्र विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या हैदराबादने ठराविक अंतराने 4 विकेट्स गमावल्या. एलिमिनेटरच्या या सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरही अपयशी ठरला. मात्र यानंतर केन विल्यम्सन आणि जेसन होल्डर या दोघांनी हैदराबादचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 65 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. यासह या जोडीने हैदराबादला विजय मिळवून दिला. केनने 44 चेंडूत 2 सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 50 धावा केल्या. तर जेसन होल्डरने नाबाद 24 धावांची खेळी करत केनला चांगली साथ दिली.

विजयी खेळीनंतर केनची प्रतिक्रिया

“अशा महत्वाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणं आव्हानात्मक होतं. होल्डरनेही काही चांगले उत्तुंग फटके लगावले. मला होल्डरने चांगली साथ दिली. होल्डर शांत स्वभावाचा आहे. जेसन हा संघासाठी निर्णायक भूमिका बजावणारा खेळाडू आहे. त्याने बंगळुरुविरुद्ध अशीच भूमिका बजावली”, असं केन सामन्यानंतर म्हणाला.

क्वालिफायर – 2

हैदराबादने बंगळुरुवर विजय मिळवत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. हैदराबादची या क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) गाठ पडणार आहे. हा सामना 8 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुदध (Mumbai Indians) भिडणार आहे. अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : हैदराबादची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात, क्वालिफाय 2 सामन्यात दिल्लीविरुद्ध भिडणार

IPL 2020 SRH vs RCB Eliminator: विराट कोहलीने ‘या’ खेळाडूवर फोडले RCBच्या पराभवाचे खापर

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : 10 व्या सामन्यानंतर आम्ही भरकटलो, बंगळुरुचा हेड कोच सायमन कॅटिचची कबुली

IPL 2020, SRH vs RCB, Eliminator : टॉस जिंकताच हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम, धोनी-रोहितच्या पंगतीत स्थान

ipl 2020 srh vs rcb eliminator hyderabad beats bangalore by 6 wickets captain david warner happy after victory reveals secret of hyderabad

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.