IPL Auction 2021 Live Streaming | लिलाव कधी, कुठे, किती संघ सहभागी, कोणाकडे किती रक्कम?

IPL 2021 auction live streaming online 18 february 3 pm in chennai india time : आयपीएल 2021 च्या लिलाव कार्यक्रमात (IPL 2021 Auction) एकूण 292 खेळाडू सहभागी होत आहेत.

IPL Auction 2021 Live Streaming | लिलाव कधी, कुठे, किती संघ सहभागी, कोणाकडे किती रक्कम?
आयपीएलच्या 14 व्या पर्वासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वासाठीचा लिलाव कार्यक्रम (IPL Auction 2021) आज होत आहे. या मिनी ऑक्शनसाठी सर्व फ्रँचायजींमध्ये आणि सहभागी खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या लिलावात एकूण 292 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यापैकी केवळ 62 खेळाडूंचीच या मोसमासाठी निवड करण्यात येणार आहे. यामुळे कोणते खेळाडू नशिबवान ठरणार, कोणाला किती रक्कम मिळणार, यासाठी खेळाडूंमध्ये तसेच चाहत्यांमध्ये जितकी उत्सुकता आहे, तेवढीच धाकधूकदेखील आहे. दरम्यान हा लिलाव प्रक्रियेचा कार्यक्रम कुठे पार पडणार, किती वाजता सुरुवात होणार, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (ipl 2021 auction live streaming online 18 february 3 pm in chennai)

आयपीएल 2021 लिलाव कुठे होणार?

यावेळी बीसीसीआय चेन्नईमध्ये आयपीएल 2021 लिलावाचे आयोजन करीत आहे. चेन्नईच्या आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमध्ये या खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे.

लिलावाची दिनांक आणि वेळ

आयपीएल 2021 लिलाव गुरुवारी 18 फेब्रुवारी 2021 ला दुपारी 3 वाजता लिलाव सुरू होणार आहे. ही लिलाव प्रक्रिया तीन ते चार तासांपर्यंत होऊ शकते.

लिलावात किती खेळाडू सहभागी होतील?

यावेळी आयपीएल 2021 लिलावात एकूण 292 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये 144 भारतीय, 122 परदेशी आणि 3 असोशिएट संघाचे खेळाडू आहेत. या मिनी ऑक्शनमध्ये एकूण 292 पैकी 62 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. या 62 खेळाडूंवर 8 संघांची नजर असणार आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या लिलावासाठी एकूण 1 हजार 97 खेळाडूंनी नोंदणी केली होती. यापैकी एकूण 292 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते आणि यादी 8 सर्व फ्रँचायझींना पाठविण्यात आली.

किती संघ सहभागी होणार?

आयपीएल 2021 च्या लिलावात मागील मोसमप्रमाणे यावेळेसही 8 संघांचा समावेश असणार आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, किंग्जस इलेव्हन पंजाब (पंजाब किंग्ज) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी सहभागी होणाऱ्या संघाची नावं आहेत.

सर्वाधिक रक्कम कोणाकडे?

या लिलावासाठी सर्वाधिक रक्कम ही पंजाबकडे आहे. पंजाबकडे 53 कोटी 20 लाख इतकी रक्कम आहे. तर कोलकाताकडे सर्वात कमी म्हणजेच 10 कोटी 75 लाख इतकी राशी आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलनुसार प्रत्येक फ्रँचायजीला किमान 75 टक्के रक्कम ही खर्च करणं बंधनकारक असणार आहे. असं न केल्यास संबंधित फ्रँचायजीकडील उर्वरित रक्कम ही जप्त केली जाईल.

पंजाबकडे लिलावासाठी उपलब्ध रक्कम-53 कोटी 20 लाख

बंगळुरुकडे असलेली रक्कम 35 कोटी 90 लाख

राजस्थानकडील रक्कम- 34 कोटी 85 लाख

चेन्नईकडे असलेली एकूण रक्कम – 22 कोटी 90 लाख

गतविजेत्या मुंबईकडे लिलावासाठी उपलब्ध रक्कम राशी – 15 कोटी 35 लाख

उपविजेतेपद मिळवलेल्या दिल्लीकडे असलेली रक्कम – 12 कोटी 90 लाख

हैदराबादकडे लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम-10 कोटी 75 लाख

कोलकाताकडे लिलावासाठी उपलब्ध रक्कम- 10 कोटी 75 लाख

लाईव्ह ऑक्शन कुठे पाहता येणार?

लिलावाचा कार्यक्रम क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहता येणार आहे. तसेच ऑक्शन हॉटस्टारवरही पाहता येईल.

संबंधित बातम्या :

IPL 2021 Auction Rules | आयपीएलच्या मिनी ऑक्शनदरम्यान सर्व फ्रँचायजींसाठी महत्वाचे 6 नियम

नागालँडचा एकलव्य, शेन वॉर्नचे व्हिडीओ पाहून फिरकी शिकला, आता आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज

IPL 2021 auction | लिलाव प्रक्रियेत 292 खेळाडू, जाणून घ्या 2 कोटींच्या बेस प्राईजमधील खेळाडूंची नावं

(ipl 2021 auction live streaming online 18 february 3 pm in chennai)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI