AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 CSK vs SRH Live Streaming: चेन्नई विरुद्ध हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 Chennai Super Kings vs Sunrisers Hydrabad Live Streaming : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 23 वी मॅच आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Chennai Super Kings vs Sunrisers Hydrabad) या दोन्ही संघांदरम्यान खेळविली जाणार आहे.

IPL 2021 CSK vs SRH Live Streaming: चेन्नई विरुद्ध हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?
दिल्लीत आज धोनी vs वॉर्नर
| Updated on: Apr 28, 2021 | 11:50 AM
Share

नवी दिल्ली : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 23 वी मॅच आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Chennai Super Kings vs Sunrisers Hydrabad) या दोन्ही संघांदरम्यान खेळविली जाणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियवर हा उत्कंठावर्धक सामना रंगणार आहे. दिल्लीत एकीकडे कोरोनाचा प्रकोप सुरु आहे तर दुसरीकडे आजपासून आयपीएलच्या उर्वरित काही मॅचेस दिल्लीत होणार आहेत. मागच्या 24 तासांत दिल्लीत 24 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 381 रुग्णांना आपल्या जीवाला मुकावं लागलं आहे. अशा वातावरणात दिल्लीत सामने पार पडणार आहे. कोरोनाच्या प्रकोपात दिल्लीत सुरक्षितपणे सामन्यांचं आयोजन करणं हे बीसीसीआयपुढचं मोठं आव्हान असणार आहे. (IPL 2021 Chennai Super Kings vs Sunrisers Hydrabad Live Streaming When And Where To Watch Online in Marathi on 28th April)

आजचा सामना दिल्लीमधील या मोसमातील पहिला सामना असेल. त्याचबरोबर या सामन्यात दोन्ही संघ हंगामात प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 5-5 सामने खेळले आहेत. पहिल्या 5 पैकी सलग 4 सामने जिंकल्यानंतर गुणतालिकेत चेन्नई दुसर्‍या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादने 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे हैदराबादचा संघ गुणतालिकेत सर्वांत तळाशी आहे.

इतिहास काय सांगतो?

आयपीएलच्या पीचवर दोन्ही संघ आतापर्यंत 14 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये 10 सामन्यांत चेन्नईने हैदराबादला धोबीपछाड दिला आहे तर केवळ चार सामन्यांत हैदराबादने चेन्नईला नमवलं आहे. पाठीमागील मोसमात दोन वेळा हैदराबाद-चेन्नई यांच्यात लढत झाली. ज्यात 1-1 असा निकाल लागला. एकंदरिच आजच्या सामन्यातही चेन्नईचा वरचष्मा कायम आहे.

सामना कधी आणि कुठे…?

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SH) यांच्यातील सामना आज 28 एप्रिल रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SH)यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सची अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 Chennai Super Kings vs Sunrisers Hydrabad Live Streaming When And Where To Watch Online in Marathi on 28th April)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.