IPL 2021 : गेल डिव्हिलियर्सला विसराल, विराट कोहलीविरुद्ध पदार्पण करणार हे 100 नंबरी सोनं!

कोहलीसेनेच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्यासाठी पंजाब संघ व्यवस्थापन आणि कर्णधार के एल राहुल डेव्हिड मलानला प्लेइंग 11 मध्ये संधी देऊ शकता, अशी जास्त शक्यता आहे.  (IPL 2021 Dawid Malan May be Play Against Virat kohli RCB For PUnjab Kings)

IPL 2021 : गेल डिव्हिलियर्सला विसराल, विराट कोहलीविरुद्ध पदार्पण करणार हे 100 नंबरी सोनं!
इंग्लंडचा धडाकेबाज आक्रमक फलंदाज डेव्हिड मलान आज विराटच्या बंगळुरुविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता

अहमदाबाद : आयपीएलच्या (IPL 2021) महत्त्वपूर्ण सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore vs punjab Kings) यांच्यात टक्कर होईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी साडे सात वाजता खेळला जाईल. पॉईंट टेबलमध्ये आपले स्थान बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे, तर पंजाबची लढाई प्लेऑफ स्पर्धेत स्वत: ला जिवंत ठेवण्यासाठी असेल. अशा या सामन्यात पंजाब धडाकेबाज कामगिरी सज्ज झालेला असताना इंग्लंडचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मलान (David Malan) आज विराटच्या बंगळुरुविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करु शकतो. (IPL 2021 Dawid Malan May be Play Against Virat kohli RCB For Punjab Kings)

कोहलीसेनेच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्यासाठी पंजाब संघ व्यवस्थापन आणि कर्णधार के एल राहुल डेव्हिड मलानला प्लेइंग 11 मध्ये संधी देऊ शकता, अशी जास्त शक्यता आहे. डेव्हिड मलान सुरुवीतीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडण्यासाठी ओळखला जातो तसंच तो जर काही वेळ खेळपट्टीवर टिकला तर समोरच्या संघाच्या बारा वाजवल्याशिवाय तो राहत नाही, अशी त्याची धडाकेबाज कामगिरी आहे.

डेव्हिड मलान आज विराटविरोधात पदार्पण करण्याची शक्यता

जर इंग्लंडचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मलानला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याची बॅठ जर आज बोलली तर ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांसारख्या दिग्गजांच्या बॅटिंगची तुम्हाला आठवणही येणार नाही, इतका मलान उत्तम खेळतो.

डेव्हिड मलानने अजूनपर्यंत आयपीएलमध्ये पदार्पण केलेलं नाही. आयपीएलच्या लिलावात त्याला पहिल्यांदा खरेदी करण्यात आले आहे. जर त्याने बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं तर जगातील सर्वात लोकप्रिय टी -20 लीगमधील हा त्याचा पहिला सामना असेल.

टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये वेगवान 1000 रन्स करणारा फलंदाज

आयसीसी टी -२० क्रमवारीत डेव्हिड मलान अव्वल स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये मलानने सर्वात वेगवान 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वांत वेगवान 1000 धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. इंग्लंडकडून खेळणाऱ्या 33 वर्षीय डेव्हिड मलानने 24 सामन्यांत 1003 धावा करुन इतिहास रचला आहे.

(IPL 2021 Dawid Malan May be Play Against Virat kohli RCB For Punjab Kings)

हे ही वाचा :

IPL 2021 : सलग 6 बॉलवर 6 चौकार खाल्ल्यानंतर शिवम मावीने दाबला पृथ्वी शॉ चा गळा!

IPL 2021 : चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने पत्नीला किस केलं, जहीर खानच्या बायकोने फोटो ट्विट केला अन्….

IPL 2021 : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग, सलग तीन मॅचमध्ये ‘असा’ कारनामा! चर्चेला उधाण…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI