IPL 2021 : ‘छोटा  पॅकेट बडा धमाका’, पृथ्वी जोमात, विराट-रोहित कोमात, सोबत तोडले दोघांचेही रेकॉर्ड!

बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉने कमाल करुन दाखवली. त्याने एकसोबतच बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा रेकॉर्ड तोडला. (IPL 2021 Dc vs RCb prithvi Shaw Break Virat kohli And Rohit Sharma Record)

IPL 2021 : 'छोटा  पॅकेट बडा धमाका', पृथ्वी जोमात, विराट-रोहित कोमात, सोबत तोडले दोघांचेही रेकॉर्ड!
पृथ्वी शॉ, दिल्ली कॅपिटल्स
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 9:42 AM

अहमदाबाद :  मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आयपीएलच्या 14 व्या पर्वात (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. नुसताच खेळत नाही तर आपल्या बॅटच्या जादूने तो भल्याभल्यांना आपली तारीफ करायला भाग पाडतोय. बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने कमाल करुन दाखवली. त्याने एकसोबतच बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) रेकॉर्ड तोडला. त्याच्या या कारनाम्यामुळे दिग्गज खेळाडूही त्याचं कौतुक करतायत. (IPL 2021 Dc vs RCb prithvi Shaw Break Virat kohli And Rohit Sharma Record)

पृथ्वी शॉ ने विराट-रोहितचा रेकॉर्ड मोडला!

सर्वाधिक कमी वयात पृथ्वी शॉने 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा पूर्ण करताना त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला. सर्वात कमी वयात 1000 धावा पूर्ण करणारा पृथ्वी दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने केवळ 21 वर्ष आणि 169 दिवसांत ही कामगिरी करुन दाखवली आहे.

विराट कोहलीने 22 वर्ष आणि 175 दिवस तर रोहित शर्माने 22 वर्ष आणि 340 दिवस एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी घेतले होते. मुंबईकर पृथ्वी शॉने दोघांनाही मागे टाकत केवळ 31 वर्ष आणि 169 दिवसांमध्ये 1000 धावा पूर्ण करत रोहित-विराटचा रेकॉर्ड मोडला आहे.

पृथ्वी शॉने संजू सॅसमनचा देखील रेकॉर्ड तोडला. संजूने 21 वर्ष आणि 183 दिवसांचा असताना आयपीएलमध्ये 1000 धावा केल्या होत्या.

पृथ्वी शॉच्या आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण

पृथ्वी शॉने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 18 चेंडूत 21 धावांची खेळी केली, ज्यात तीन चौकारांचा समावेश होता. या डावात आठवी धाव घेताच त्याने आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. पृथ्वी शॉने 44 सामन्यांत 1000 धावांचा टप्पा गाठला.

आयपीएलमध्ये सर्वांत कमी वयात 1000 रन्स कुणाच्या नावावर?

रिषभ पंत- 20 वर्ष 218 दिवस पृथ्वी शॉ- 21 वर्ष 169 दिवस संजू सॅमसन- 21 वर्ष 183 दिवस

(IPL 2021 Dc vs RCb prithvi Shaw Break Virat kohli And Rohit Sharma Record)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘कुणी खेळाडू देतं का खेळाडू…’ राजस्थानवर संकट, कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं…!

IPL 2021 : रिषभ पंतने अमित मिश्राला बोलिंगसाठी बोलवलं पण अंपायर्सनी थांबवलं, वाचा मैदानात नेमकं काय घडलं?

IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, ए बी डिव्हिलियर्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.