Video : रिषभला आऊट दिलं, विराट भलताच खुश झाला, अंपायर्सनी निर्णय बदलताच चेहरा बघण्याजोगा झाला!

मॅचमध्ये असा एक प्रसंग आला होता की बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat kohli) चेहरा बघण्यासारखा झाला होता. कॅमेरामध्ये त्याचा तोच पडका चेहरा कैद झाला आणि लागलीच सोशल मीडियावर व्हायरलही झाला. | Virat kohli reaction

Video : रिषभला आऊट दिलं, विराट भलताच खुश झाला, अंपायर्सनी निर्णय बदलताच चेहरा बघण्याजोगा झाला!
रिषभ पंत आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 10:20 AM

अहमदाबाद : अखेरच्या चेंडूपर्यंत चाललेला दिल्ली विरुद्ध बंगळुरु (DC vs RCB) हा रोमांचक सामना विराटसेनेने अवघ्या एका धावेने जिंकला. पीचवर तुफानी अर्धशतकी खेळी करणारा शिमरन हेटमायर (shimron hetmyer) आणि दिल्लीचा तडाखेबाज कर्णधार रिषभ पंत (Rishabh pant) असताना देखील बंगळुरुचा यॉर्कर किंग मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) अखेरच्या षटकात दिल्लीला 14 धावा करु दिल्या नाहीत. विराटसेनेने दिल्लीवर सनसनाटी विजय मिळवत गुणतालिकेत पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली. दरम्यान, मॅचमध्ये असा एक प्रसंग आला होता की बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat kohli) चेहरा बघण्यासारखा झाला होता. कॅमेरामध्ये त्याचा तोच पडका चेहरा कैद झाला आणि लागलीच सोशल मीडियावर व्हायरलही झाला. (IPL 2021 DC vs RCB Virat kohli reaction When Upmire Change the Decision Rishabh pant Notout)

विराट कोहलीचा चेहरा नेमका कशामुळे पडला?

बंगळुरुच्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन आणि फॉर्मात असलेला पृथ्वी शॉ स्वस्तात माघारी परतले. साहजिक रिषभ पंतला लवकरच बॅटिंगसाठी यावं लागलं. दिल्लीच्या डावाच्या 7 व्या ओव्हरमध्ये वॉश्गिंटन सुंदर बोलिंग करत होता. यावेळी त्याने रिषभ पंतला चकवा देत सुंदर बॉल टाकला, तो बॉल नेमका रिषभने स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, या प्रयत्नात तो चकला. विराट डीव्हिलियर्स आणि वॉश्गिंटन सुंदरने जोराची अपील केली. अंपायर्सने रिषभला आऊट दिलं. साहजिकच विराटला खूप आनंद झाला. रिषभ गेला म्हणजे म्हणजे मॅच आता हातात आली, असं त्याला वाटलं.

अंपायर्सने रिषभला नॉट आऊट दिलं आणि…

चतुर रिषभने डीआरएसचा वापर केला. या वेळी रिप्लेमध्ये चेंडूने बॅटची कड घेतल्याचं स्पष्ट दिसलं. साहजिक थर्ड अंपायरने रिषभला नॉट आऊट दिलं. जसं अंपायर्सचा निर्णय आला तसा विराटचा खुललेला चेहरा क्षणात पडला. विराटचा हाच पडका चेहरा कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर तोच फोटो व्हायरल झाला.

बंगळुरुचा दिल्लीवर केवळ 1 रन्सने विजय

बंगळुरु विरुद्ध दिल्ली या तुल्यबळ सामन्यात बंगळुरुने दिल्लीवर अवघ्या एका रन्सने निसटता विजय मिळवला आहे. बँगलोरने दिल्लीला 172 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु दिल्लीला निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 170 धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला 14 रन्सची गरज होती. मात्र मोहम्मद सिराजने टिच्चून बोलिंग केली. त्याने यॉर्कर खूप नजाकतीने टाकले. तरीही पंतने त्याला दोन चौकार ठोकले. अखेर दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन्सच करता आल्या. शेवटी बंगळुरुचा 1 रन्सने विजय झाला. यावेळी रिषभ पंत खूपच निराश झाला होता तर विराटला गगनात आनंद मावत नव्हता.

(IPL 2021 DC vs RCB Virat kohli reaction When Upmire Change the Decision Rishabh pant Notout)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘छोटा  पॅकेट बडा धमाका’, पृथ्वी जोमात, विराट-रोहित कोमात, सोबत तोडले दोघांचेही रेकॉर्ड!

IPL 2021 : ‘कुणी खेळाडू देतं का खेळाडू…’ राजस्थानवर संकट, कोरोनाने होत्याचं नव्हतं केलं…!

IPL 2021 : रिषभ पंतने अमित मिश्राला बोलिंगसाठी बोलवलं पण अंपायर्सनी थांबवलं, वाचा मैदानात नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.