SRH vs KKR : शेर कभी बुडा नही होता! दोन संघांना IPL चषक मिळवून देणारा 40 वर्षीय खेळाडू मैदानात

आयपीएल 2021 स्पर्धेतील तिसर्‍या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात टक्कर सुरु आहे.

SRH vs KKR : शेर कभी बुडा नही होता! दोन संघांना IPL चषक मिळवून देणारा 40 वर्षीय खेळाडू मैदानात
Harbhajan Singh
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 9:00 PM

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धेतील तिसर्‍या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात टक्कर सुरु आहे. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या वतीने या सामन्याद्वारे एक दिग्गज खेळाडू पदार्पण करत आहे. हरभजन सिंह (Harbhajan Singh) असे या खेळाडूचे नाव आहे. (IPL 2021 : Harbhajan Singh debuts for KKR in Sunrisers Hyderabad vs Kolkata knight Riders match)

हरभजन 2008 पासून आयपीएल खेळतोय. पण केकेआरकडून पहिल्यांदाच तो या स्पर्धेत उतरत आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसारख्या मोठ्या संघांकडून खेळला आहे. केकेआर हा त्याचा आयपीएलमधला तिसरा संघ आहे. हरभजन सिंहने यापूर्वी मुंबईच्या संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात हरभजन तब्बल 699 दिवसांनी मैदानात उतरला आहे. 12 मे 2019 ला तो शेवटचा मैदानात दिसला होता. तेव्हा ते चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळला होता.

केकेआरने हरभजन सिंहला त्याच्या दोन कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर संघात सामावून घेतलं आहे. यापूर्वी हरभजन सिंह शेवटच्या तीन मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. 2018 मध्ये तो आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. काही कौटुंबिक कारणास्तव तो आयपीएल 2020 मध्ये खेळू शकला नाही. त्यानंतर आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी सीएसकेने त्याला संघमुक्त केलं होतं. सीएसकेकडून खेळण्यापूर्वी हरभजन 2008 ते 2017 पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. या काळात मुंबईने तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.

आयपीएलमधील यशस्वी गोलंदाज

40 वर्षीय हरभजन सिंहने आयपीएलमधील 161 सामन्यांमध्ये आतापर्यंत 150 बळी घेतले आहेत. 18 धावा देऊन 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 150 पैकी 23 बळी त्याने चेन्नईकढून खेळताना मिळवल्या आहेत. तर उर्वरित सर्व बळी हे त्याने मुंबईकडून खेळताना मिळवले आहेत. आयपीएल 2013 चा हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्तम होता. कारण या मोसमात त्याने 19 सामन्यांमध्ये 24 बळी मिळवले होते. या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. हरभजन सिंह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. लसिथ मलिंगा (170), अमित मिश्रा (160), पियुष चावला (156), आणि ड्वेन ब्राव्हो (154) यांच्यानंतर हरभजनचा नंबर लागतो.

संबंधित बातम्या

SRH vs KKR IPL 2021, Match Prediction | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने, कोण वरचढ ठरणार?

Prithvi Shaw, IPL 2021 | चेन्नई विरुद्ध पृथ्वीची धमाकेदार खेळी, उलगडलं गमावलेल्या परफॉरमन्सचं रहस्य, विजयानंतर मोठा खुलासा

रोहित शर्माच्या बुटांवर नेमकं असं काय होतं, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं?

(IPL 2021 : Harbhajan Singh debuts for KKR in Sunrisers Hyderabad vs Kolkata knight Riders match)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.