मुंबई : आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचे (IPL 2021) वेध क्रिकेट चाहत्यांना लागले आहे. या मोसमाच्या (IPL Auction 2021) लिलाव प्रक्रियेआधी सर्वच संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. फेब्रुवारी महिन्यात लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान या आधी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) एक मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेचा अनुभवी कर्णधार कुमार संगकाराकडे (Kumar Sangakara) मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. संगकाराची राजस्थानच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली आहे. राजस्थान रॉयल्सने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. (ipl 2021 rajasthan royals appoints Kumar Sangakara as a director of Cricket)
Adding some 𝗹𝗲𝗴𝗲𝗻𝗱𝗮𝗿𝘆 to the #RoyalsFamily. 💗#WelcomeSanga | #HallaBol | @KumarSanga2 pic.twitter.com/4zREps1PlW
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 24, 2021
या नियुक्तीमुळे संगकाराकडे फ्रँचायझीच्या इकोसिस्टमवर लक्ष देण्याची जबाबदारी असणार आहे. लिलाव प्रक्रिया, टॅलेंट सर्च, कोचिंग स्ट्रक्चर, टीम स्ट्रेटेजी आणि डेव्हलमेंट या सर्व बाबींची जबाबदारी संगकाराकडे असणार आहे. नागपूरमध्ये राजस्थान रॉयल्स ची अॅकेडमी आहे. या अॅकेडमीच्या सर्व कारभाराची मदार संगकाराच्या खांद्यावर असणार आहे. एकूणच संगकाराला राजस्थानच्या ‘रॉयल’ कारभारावर लक्ष ठेवावं लागणार आहे.
या अशा महत्वाच्या पदी नियुक्ती मिळाल्याने संगकाराने आनंद व्यक्त केला आहे. “रॉयल्ससोबत जोडला गेल्याने मी आनंदी आहे. मी भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज आहे. टीमच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करेन”, अशा शब्दात संगकाराने आनंद व्यक्त केला.
“संगकारा अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याला टी 20 क्रिकेटबद्दल अधिक माहिती आहे. तो सर्वोत्तम विकेटकीपरपैकी एक आहे. या अशा दिग्गज खेळाडूसोबत काम करण्याची संधी मला मिळणार आहे. ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे”, अशी प्रतिक्रिया राजस्थानचा नवनिर्वाचित कर्णधार संजू सॅमसनने दिली. काही दिवसांपूर्वी राजस्थानने कर्णधारपदावरून स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी करत संजूची त्या जागेवर नियुक्ती केली.
संगकारा आयपीएलमध्ये एकूण 6 मोसमात खेळला आहे. यामध्ये त्याने सनरायजर्स हैदराबादचे (डेक्कन चार्जर्स) नेतृत्व केलं आहे. संगकाराने एकूण 71 सामन्यात 121.19 च्या सरासरीने 10 अर्धशतकांसह 1 हजार 687 धावा केल्या आहेत. तसेच त्याने विकेटकीपरची भूमिकाही यशस्वीरित्या पार पाडली आहे.
बेन स्टोक्स, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), जोस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, जयदेव उनाडकट, अँड्र्यू टाय, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे, अनुज रावत आणि यशस्वी जयस्वाल.
स्टीव्ह स्मिथ, वरुण आरोन, टॉम कुरन, अंकित राजपूत, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग, ओशाणे थॉमस, आकाश सिंग आणि रॉबिन उथप्पा.
संबंधित बातम्या :
RR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड
(ipl 2021 rajasthan royals appoints Kumar Sangakara as a director of Cricket)