AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs RR 2021, Virat Kohli | कोहलीचा भीमप्रराक्रम, आयपीएलमध्ये ‘विराट’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 16 व्या सामन्यात बंगळुरुचा कर्णधार (Virat Kohli) विराट कोहलीने 6 हजार (6 Thousand Runs In IPL) धावांचा टप्पा पार केला आहे.

RCB vs RR 2021, Virat Kohli | कोहलीचा भीमप्रराक्रम, आयपीएलमध्ये 'विराट' कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 16 व्या सामन्यात बंगळुरुचा कर्णधार (Virat Kohli) विराट कोहलीने 6 हजार (6 Thousand Runs In IPL) धावांचा टप्पा पार केला आहे.
| Updated on: Apr 22, 2021 | 11:52 PM
Share

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 10 विकेट्सने अफलातून विजय मिळवला आहे. राजस्थानने बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरने एकही विकेट न गमावता 16.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने (Devdutt Padikkal) सर्वाधिक 101 धावांची नाबाद खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह कोहलीने विराट पराक्रम केला आहे. विराट आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. (ipl 2021 rcb vs rr royal challengers banglore captain virat kohli become first batsman who complete 6 thousand runs)

काय आहे पराक्रम?

विराट कोहलीने आयपीएलमध्ये 6 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराट आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराटला या सामन्याआधी 51 धावांची आवश्यकता होती. विराटने आधी 34 चेंडूत अर्धशतक झळकावलं. हे अर्धशतक त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 40 वं अर्धशतक ठरलं. अर्धशतकानंतर विराटला 6 हजार धावांसाठी अवघ्या 1 धावेची आवश्यकता होती. तेव्हा विराटने चौकार खेचला. यासह विराटने 6 हजार धावा पूर्ण केल्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

या कामगिरीसह विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावे आता 196 सामन्यांमध्ये 6 हजार 21 धावा झाल्या आहेत. विराटनंतर या यादीत चेन्नईच्या ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाने 5 हजार 448 धावा चोपल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ‘गब्बर’ शिखर धवन आहे. चौथ्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. तर पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडिन्सचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आहे.

संबंधित बातम्या :

RCB vs RR : देवदत्त पडीक्कलचे अफलातून शतक, ठरला तिसरा युवा फलंदाज

RCB vs RR, IPL 2021 Match 16 Result | देवदत्त पडीक्कलचे शतक, विराटची शानदार खेळी, बंगळुरुचा विजयी ‘चौकार’, राजस्थानवर 10 विकेट्सने मात

VIDEO | मला टॉस जिंकण्याची सवय नाही, त्यामुळे गडबड झाली, टॉसदरम्यान विराट कोहलीचा गोंधळ

(ipl 2021 rcb vs rr royal challengers banglore captain virat kohli become first batsman who complete 6 thousand runs)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.