VIDEO | मला टॉस जिंकण्याची सवय नाही, त्यामुळे गडबड झाली, टॉसदरम्यान विराट कोहलीचा गोंधळ

बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सामन्यापूर्वी नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

VIDEO | मला टॉस जिंकण्याची सवय नाही, त्यामुळे गडबड झाली, टॉसदरम्यान विराट कोहलीचा गोंधळ
Virat Kohli, Sanju Samson
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 8:09 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 16 व्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सामन्यापूर्वी नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु टॉसवेळी विराट कोहलीने एक गोंधळ घातल्याचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Virat Kohli forgets he win Toss against Sanju Samson in RCB vs RR match 16 IPL 2021)

सामन्यापूर्वी विराट कोहलीने टॉस जिंकला होता. परंतु नाणं खाली पडताच विराटने राजस्थानचा कर्णधार संजू सॅसमनचं (Sanju Samson) अभिनंदन करत त्याला पुढे होत निर्णय घेण्याची विनंती केली. संजूदेखील समलोचकांच्या समोर आला, तोवर दोघांच्याही लक्षात आलं की टॉस विराटने जिंकला होता. त्यानंतर विराट सॉरी म्हणत पुढे आला आणि आपण प्रथम क्षेत्ररक्षण करणार अस्लयाचे जाहीर केले. यावेळी विराट, संजू आणि समलोचक Ian Bishop तिघांनाही हसू आवरता आलं नाही. यावेळी विराट म्हणाला की, त्याला टॉस जिंकण्याची सवय नाही, त्यामुळेच त्याच्याकडून ही गडबड झाली.

व्हिडीओ पाहा

दोन रॉयल संघ आमनेसामने

बँगलोर विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. बंगळुरुचा संघ या सामन्यात विजय मिळवून विजयी घोडदौड कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला आहे. तर राजस्थानसमोर बंगळुरुचे मजबूत आव्हान आहे.

आयपीएलच्या 14 व्या हंगामात उभय संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. उभयसंघ आतापर्यंत या पर्वात प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. बंगळुरुने या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे, तर उर्वरित 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत बंगळुरु 6 गुणांसह दुसऱ्या तर राजस्थान 2 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे.

आकडेवारी कोणाच्या बाजूने?

आयपीएलच्या इतिहासात बंगळुरु आणि राजस्थान आतापर्यंत एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. आकडेवारीनुसार दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. बंगळुरु आणि राजस्थानने प्रत्येकी 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर उर्वरित 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.

अशी आहे विराटसेना

विराट कोहली (कर्णधार), देवदत्‍त पडीक्‍कल, एबी डिव्हीलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमीन्सन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल

राजस्थान रॉयल्‍सची प्लेइंग इलेव्हन

संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), जॉस बटलर, मनन वोहरा, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, शिवम दुबे, ख्रिस मोरिस, श्रेयस गोपाळ, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन साकरिया

संबंधित बातम्या

RCB vs RR, IPL 2021 Match Prediction | दोन रॉयल संघ आमनेसामने, विराट कोहली विजयी घोडदौड कायम ठेवणार की संजू सॅमसन बाजी मारणार?

IPL 2021, RCB vs RR Head to Head Records | बंगळुरु विरुद्ध राजस्थान आमनेसामने, 2 खेळाडू आणि उभयसंघांची 23 सामन्यांमधील कामगिरी, कोण ठरणार वरचढ?

(Virat Kohli forgets he win Toss against Sanju Samson in RCB vs RR match 16 IPL 2021)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.