IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरची सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी, ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान

IPL च्या मोसमादरम्यान कर्णधार बदलण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी गत मोसमात कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅप्टन बदलण्यात आला होता.

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरची सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी, 'या' खेळाडूकडे संघाची कमान
David Warner

हैदराबाद : आयपीएल 2021 (IPL 2021) मधील खराब कामगिरीचा परिणाम सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) होऊ लागला आहे. या संघाने 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. 2 गुणांसह हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. त्यामुळेच आता संघाने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. SRH ने डेव्हिड वॉर्नरला (David Warner) कर्णधारपदावरून हटवून केन विल्यमसनकडे (Kane Williamson) कर्णधारपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. केन आता पुढील सर्व सामन्यांमध्ये संघाची कमान सांभाळेल. (IPL 2021: Sunrisers Hyderabad remove David Warner from captaincy, Kane Williamson takes charge)

डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदापासून मुक्त करण्यात आले आहे, तर केन विल्यमसनकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, याबाबत सनरायझर्स हैदराबाद टीम मॅनेजमेंटने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी संघाच्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केले आहे. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, आयपीएलमधील पुढील सामन्यांमध्ये केन विल्यमसन हैदराबादच्या संघाचं नेतृत्व करेल.

दरम्यान, मोसमादरम्यान कर्णधार बदलण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी गत मोसमात कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅप्टन बदलण्यात आला होता. त्यावेळी दिनेश कार्तिकने नेतृत्वाची जबाबदारी ओईन मॉर्गनला दिली होती.

परदेशी खेळाडूंचं कॉम्बिनेशन बदलणार

SRH ने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, 2 मे रोजी हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्यात हैदराबादच्या संघात परदेशी खेळाडूंचं वेगळं कॉम्बिनेशन पाहायला मिळू शकतं. याचाच अर्थ जे परदेशी खेळाडू रेग्युलर संघात आहेत त्यांचं प्लेईँग इलेव्हनमधील स्थान धोक्यात आहे.

डेव्हिड वॉर्नरचं काय होणार?

संघव्यवस्थापनाने कर्णधार आणि प्लेईँग इलेव्हनमधील खेळाडू बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता संघात डेव्हिड वॉर्नरची भूमिका काय असणार हा प्रश्न आहे, सनरायझर्सच्या संघव्यवस्थापनाने सांगितले की, वॉर्नर संघासोबतच राहील. तो आमच्या संघाच्या यशाचा प्रमुख सूत्रधार आहे. मैदानात किंवा मैदानाबाहेर वॉर्नर संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याने संघासाठी आतापर्यंत जे योगदान दिलं आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो. तथापि, डेव्हिड वॉर्नर प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल की नाही, हे संघ व्यवस्थापनाने आपल्या निवेदनातून कुठेही स्पष्ट केलेले नाही.

अर्धशतकांचं अर्धशतक करणारा एकमेव फलंदाज

डेव्हिडी वॉर्नरने काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये भीमपराक्रम केला आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये अर्धशतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. म्हणजे वॉर्नरने आयपीएलमध्ये 50 अर्धशतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

टी-20 मध्ये केनच्या नेतृत्वगुणाची कसोटी

दरम्यान आता वॉर्नर कर्णधाराच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहे. त्यामुळे आता वॉर्नरकडून उर्वरित सामन्यात आणखी दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तसेच अडचणीत असलेल्या हैदराबादला केन विलियमन्सन कसा बाहेर काढतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

वॉर्नरची एकाकी झुंज

डेव्हिड वॉर्नर या मोसमाच्या सुरुवातीपासून एकाकी झुंज दिली आहे. वॉर्नरने आतापर्यंत फलंदाजीत दरवर्षीप्रमाणे शानदार कामगिरी केली आहे. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने त्याच्या सहकाऱ्यांकडून योग्य साथ मिळाली नाही. वॉर्नरने या मोसमातील आतापर्यंत एकूण 6 सामन्यात 110.28 च्या स्ट्राईक रेट आणि 32.16 सरासरीने 2 अर्धशतकांसह 193 धावा केल्या आहेत.

गुणतालिकेत शेवटून पहिला क्रमांक

सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत शेवटच्या म्हणजेच 8 व्या क्रमांकावर आहे. हैदराबादने आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. तर 5 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

इतर बातम्या

‘मी पैशांसाठी पगडी घालत नाही’, आयपीएलचा स्टार खेळाडू हरप्रीतची अक्षय कुमारला चपराक

IPL 2021, CSK vs MI Head to Head Records | मुंबई विरुद्ध चेन्नई कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने, कोण जिंकणार मॅच?

IPL 2021 : माझी छाती गर्वाने फुगलीय, माझ्या करियरमध्ये मला जमलं नाही ते ‘पृथ्वी’ने करुन दाखवलं : वीरेंद्र सेहवाग

(IPL 2021: Sunrisers Hyderabad remove David Warner from captaincy, Kane Williamson takes charge)

Published On - 5:07 pm, Sat, 1 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI