AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : वानखेडे स्टेडियमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, आणखी कर्मचारी पॉझिटिव्ह, मुंबईत आयपीएल सामन्यांवर संकट?

पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमधील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. IPL 2021 Wankhede Stadium 3 Groundmen tested Corona Positive

IPL 2021 : वानखेडे स्टेडियमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, आणखी कर्मचारी पॉझिटिव्ह, मुंबईत आयपीएल सामन्यांवर संकट?
वानखेडे स्टेडियमच्या 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
| Updated on: Apr 06, 2021 | 3:02 PM
Share

मुंबईआयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या मोसमाची सलामीची लढत अगदी काही तासांवर येऊन ठेपली असताना मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील (Wankhede Stadium Mumbai) कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या आठवड्यातच 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्टेडियमधील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासलं असल्याचं कळतंय. त्यामुळे मुंबईतील वानखेडे मैदानावर आयपीएलचे सामने खेळणं कितपत सुरक्षित आहेत, असा मुद्दा उपस्थित होत आहे. (IPL 2021 Wankhede Stadium 3 Groundmen tested Corona Positive)

गेल्याच आठवड्यात 08 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

वानखेडे स्टेडियमवर पुन्हा काही कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. ताज्या माहितीनुसार, वानखेडेमध्ये आणखी 3 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी दोन ग्राऊंड्समन आणि एका प्लंबरचा समावेश आहे. वानखेडे स्टेडियमवरील कोरोना संसर्गाची ही पहिलीच घटना नाही. गेल्या आठवड्यात, याच स्टेडियमचे 08 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, सोमवारी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

बीसीसीआयच्या चिंतेत भर

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होतोय. त्यामुळे राज्यात आयपीएलच्या आयोजनावर संकट निर्माण झालंय. मुंबईत उपस्थित काही खेळाडूंव्यतिरिक्त, ग्राउंड्समन ते टूर्नामेंट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सपर्यंतच्या काही कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा परिस्थितीत नवीन कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा बीसीसीआयची चिंता वाढविली आहे.

स्टेडियममध्ये तीन नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितलं की, “तपासणीत दोन कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्यामधले दोन मैदानातील कर्मचारी आहेत. दुसरीकडे एमसीए किंवा बीसीसीआयकडून या संदर्भात अजून कोणतीही माहिती किंवा कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

10 तारखेला पहिली मॅच, एकूण 10 मॅचेस वानखेडेवर

मुंबईतील वानखेडे मैदानावर 10 एप्रिल रोजी पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ही लढत खेळवण्यात येणार आहे. आयपीएलचा रणसंग्राम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. वानखेडे स्टेडियमवरही आयपीएलच्या काही सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. 10 ते 25 एप्रिलपर्यंतच्या जवळपास 10 मॅचेस वानखेडे मैदानावर होणार आहे.

मुंबईतच सामने होणार, गांगुलीचं स्पष्टीकरण

मुंबईतील नियोजित सामने वानखेडे मैदानावरच पार पडतील, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट करत नाहक चर्चेतील हवा काढून घेतली आहे. बायो बबलमध्ये खेळाडूंवर कोणताही परिणाम होत नाही. अशा वातावरणात खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे मुंबईत सामने खेळविण्यास तूर्तास तरी कोणताही धोका नाही, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे. (IPL 2021 Corona Virus Patient Wankhede Stadium)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘बापसे बेटी सवाई!’, बटलरच्या लेकीचा हृदयस्पर्शी Video

IPL मध्ये हॅट्रिक कुणी कुणी घेतली? अमित मिश्रा आणि युवराजची जादू, रोहितचा खास अंदाज!, वाचा पूर्ण लिस्ट…

IPL 2021 : कोहलीला ‘विराट’ रेकॉर्ड करण्याची संधी, असा कारनामा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनू शकतो!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.