AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 ORANGE CAP : 15 कोटी मिळाल्याने इशान किशन फलंदाजी विसरला, ऑरेंज कॅप जॉस बटलरकडे कायम

यंदाच्या आयपीएलच्या सीजनमध्ये जॉस बटलरची फलंदाजी अधिक चांगली राहिली आहे. त्याने आत्तापर्यंत तीन शतकं ठोकली आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅप अद्याप त्याच्याकडे कायम आहे. त्याची फलंदाजी चांगली होत असल्याने त्याचा संघ कामगिरीमध्ये देखील अव्वल आहे.

IPL 2022 ORANGE CAP : 15 कोटी मिळाल्याने इशान किशन फलंदाजी विसरला, ऑरेंज कॅप जॉस बटलरकडे कायम
ऑरेंज कॅपवर जॉस बटलरची पकड कायमImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 25, 2022 | 7:01 AM
Share

मुंबई – IPL 2022 च्या लिलावात इशान किशन (Ishan Kishan) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला 5 वेळा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लिलावात 15.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर आनंद व्यक्त करताना टीमने सांगितले की, ईशान हा आमचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. मात्र टी-20 लीगच्या चालू हंगामात त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. रविवारी झालेल्या सामन्यात (LSG vs MI) लखनौ सुपर जायंट्सने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. संघाचा हा सलग 8वा पराभव असून ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. या सामन्यात इशान किशनला 20 चेंडूत केवळ 8 धावा करता आल्या. एवढेच नाही तर त्याला एकही चौकार मारता आला नाही. लखनौच्या 168 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 132 धावा करू शकला.

15 कोटी मिळाल्याने इशान किशन फलंदाजी विसरला

या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करत असलेला माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने इशान किशनच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला की तो टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्ससाठी आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला 15 कोटी मिळाले, पण पैशांमुळे तो फलंदाजी विसरला आहे. 20 चेंडूत 8 धावा हे कुठेही चांगले नाही. मुंबईचा संघ संपूर्ण मोसमात झुंज देऊ शकला नाही, असे तो म्हणाला. त्याला उर्वरित सामन्यात संघर्ष दाखवावा लागणार असून कर्णधार रोहित शर्माला जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. हरभजन हा मुंबईचा कर्णधारही राहिला असून त्याने आपल्या वतीने विजेतेपदही पटकावल्याची माहिती आहे.

ऑरेंज कॅप जॉस बटलरकडे कायम

यंदाच्या आयपीएलच्या सीजनमध्ये जॉस बटलरची फलंदाजी अधिक चांगली राहिली आहे. त्याने आत्तापर्यंत तीन शतकं ठोकली आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅप अद्याप त्याच्याकडे कायम आहे. त्याची फलंदाजी चांगली होत असल्याने त्याचा संघ कामगिरीमध्ये देखील अव्वल आहे. केएल राहूल, हार्दीक पांड्या, टिळक वर्मा इत्यादी खेळाडू अद्याप जॉस बटलरच्या मागोमाग आहेत. 491 धावा जॉस बटलरने काढल्या असल्यामुळे तो क्रमांक एकवरती आहे.

‘भाजप नाच्या पोरांसारखा बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे आश्चर्यच!’ सामना अग्रलेखातून शिवसेनेचा हल्लाबोल

Yavatmal Accident : रस्ता ओलांडत असतेवेळी भरधाव वाहनानं पत्नी-पत्नीला चिरडलं! दोघेही जागीच ठार, भीषण अपघातानंतर रास्तारोको

Lata Dinanath mangeshkar Award : जितेंद्र आव्हाड म्हणतात हा तर मराठी माणसांचा अपमान, मुख्यमंत्री, पवारांच्या नावावरून रोहित पवारांचाही मंगेशकरांना टोला

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार