IPL 2022 Orange cap : ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये जॉस बटलर अव्वल, पर्पल कॅपसाठी युजवेंद्र चहलला या खेळाडूंचं खडतर आव्हान

IPL 2022 Orange cap : ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये जॉस बटलर अव्वल, पर्पल कॅपसाठी युजवेंद्र चहलला या खेळाडूंचं खडतर आव्हान
ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये जॉस बटलर अव्वल
Image Credit source: twitter

सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत, जॉस बटलरने सर्वांना मागे टाकत सातत्याने पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून फक्त 7 झाल्या. आता त्याच्या खात्यात 12 सामन्यांत 625 धावा झाल्या आहेत.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 12, 2022 | 3:01 PM

मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामात एकापेक्षा जास्त सामने खेळले जात आहेत. सर्व संघांनी 11 किंवा अधिक सामने खेळले आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये केवळ धावांचा पाऊस पडला आहे. आघाडीवर राहण्यासाठी फलंदाजांमध्ये लढाई सुरू आहे. ऑरेंज कॅपच्या (Orange cap) शर्यतीत अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे. राजस्थानच्या जॉस बटलरची (Jos Buttler) बॅट गेल्या तीन सामन्यांपासून शांत आहे. तरीही ऑरेंज कॅपच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. त्यांच्याशिवाय केएल राहुल, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर हे सुध्दा ऑरेंज कॅपच्या यादीत आहेत.

जॉस बटलर अव्वलस्थानी

सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत, जॉस बटलरने सर्वांना मागे टाकत सातत्याने पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून फक्त 7 झाल्या. आता त्याच्या खात्यात 12 सामन्यांत 625 धावा झाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लखनौचा कर्णधार केएल राहुल आहे. जो सतत धावा करत आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात राहुलला फार काही करता आले नाही, त्याला केवळ 8 धावा करता आल्या. आता त्याच्या खात्यात 12 सामन्यांत 459 धावा जमा झाल्या आहेत.

दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमाकांवर

दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने तिसरे स्थान पटकावले आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने 52 धावांची नाबाद खेळी खेळून आपली धावसंख्या 427 पर्यंत पोहोचवली आहे. त्याच्या शानदार फलंदाजीनंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 73 धावांची शानदार खेळी केली, 12 सामन्यात 389 धावा केल्या आहेत. गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यात त्याने 63 धावांची शानदार खेळी केल्यामुळे त्याची धाव संख्या 384 वर पोहोचली आहे. त्याच्या या खेळीनंतर शिखर धवन सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. धवनच्या खात्यात आता 11 सामन्यात 381 धावा जमा आहेत. त्याने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 12 धावांची खेळी केली होती. लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने 7 व्या क्रमांकावर प्रवेश केला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने 11 धावांची खेळी केली आणि त्याच्या धावांची संख्या 355 वर नेली.

पर्पल कॅप युजवेंद्र चहलच्या डोक्यावर अद्याप कायम आहे

आयपीएल 2022 ची पर्पल कॅप राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युजवेंद्र चहलच्या डोक्यावर अद्याप कायम आहे. तो या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. या मोसमात युझवेंद्रने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 7.27 च्या सरासरीने प्रत्येक षटकात धावा दिल्या आहेत. तर 15.31 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 23 बळी घेतले आहेत. पर्पल कॅपसाठी युझवेंद्रला आता दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव, पंजाब किंग्जचा कागिसो रबाडा आणि सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन यांच्याकडून खडतर आव्हान आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें