AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 च्या पहिल्या फेरीत राजस्थान टॉप तर हैदराबादचं नुकसान, वाचा कोणता संघ कोणत्या स्थानावर

आयपीएल 2023 स्पर्धा सुरु झाली असून 14 सामन्यातील पहिल्या फेरीचे सामने पार पडले आहेत. गुणतालिकेच्या गणितात राजस्थान अव्वल स्थानी आहे. तर राजस्थानचा संघ तळाशी आहे.

IPL 2023 च्या पहिल्या फेरीत राजस्थान टॉप तर हैदराबादचं नुकसान, वाचा कोणता संघ कोणत्या स्थानावर
IPL 2023 च्या पहिल्या फेरीत राजस्थान टॉप तर हैदराबादचं नुकसान, वाचा कोणता संघ कोणत्या स्थानावर
| Updated on: Apr 03, 2023 | 4:19 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा सुरु झाली असून पहिल्या टप्प्यातील सामने पूर्ण झाले आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार असून त्यावर अंतिम फेरीचं गणित ठरणार आहे. पहिल्या फेरीचे सामने सामने संपले असून प्रत्येक संघाने एक एक सामना खेळला आहे. आयपीएल गुणतालिकेत पाच संघांनी विजय, तर पाच संघांच्या पदरी निराशा आली आहे. राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सनं विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट राईडर्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदाराबादला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

आयसीसी गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सनं सनराईजर्स हैदराबादचा पहिल्याच सामन्यात दारुण पराभव केला. हैदराबादनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थाननं फलंदाजी करताना 5 गडी गमवून 203 धावा केल्या. तर हैदराबादला 8 गडी गमवून 131 धावा करता आल्या. राजस्थाननं हा सामना 72 धावांनी जिंकत अव्वल स्थान पटकावलं आहे. तर हैदराबादला गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे. मोठ्या विजयामुळे राजस्थानचा +3.600 रनरेट आहे. तर हैदराबादल -3.600 रनरेटसह सर्वात शेवटच्या स्थानी राहावं लागलं आहे.

आयसीसी गुणतालिकेत लखनऊ सुपर जायंट्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. लखनऊनं दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीला 143 धावा करता आल्या. 50 धावांनी पराभव झाल्याने दिल्लीचा गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

आयसीसी गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा 8 गडी आणि 22 चेंडू राखून पराभव केला. त्यामुळे 2 गुणांसह रनरेटमध्ये भर पडली. पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे मुंबईचा संघ आठव्या स्थानावर आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघ चौथ्या स्थानावर आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा 5 गडी आणि 4 चेंडू राखून पराभव केला. चेन्नईने गुजरातला विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गुजरातनं 19.2 षटकात पूर्ण केलं. चेन्नईचा संघ सातव्या स्थानावर आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स या सामन्यात पावसाने हजेरी लावली. हा सामना पंजाबने डकवर्थ लुईस नियमानुसार 7 धावांनी जिंकला. या विजयासाह पंजाबचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर, तर कोलकात्याचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सनं या संघांनी प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली आहे. प्रत्येक संघाला अजून 13 सामने खेळायचे आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.