AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC IPL 2023 : डेविड वॉर्नरला नेमकं झालं तरी काय ? फ्री हिटवाला चेंडू असा खेळला Watch Video

आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नरचं वेगळंंच रुप पाहायला मिळालं. आता त्याची खेळी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MI vs DC IPL 2023 : डेविड वॉर्नरला नेमकं झालं तरी काय ? फ्री हिटवाला चेंडू असा खेळला Watch Video
Dawid Warner | मुंबई इंडियन्स विरुद्ध डावखुऱ्या डेव्हिड वॉर्नर याची उजव्या हाताने बॅटिंगImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 11, 2023 | 8:33 PM
Share

मुंबई – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. दोन्ही संघांनी अद्याप पर्यंत या स्पर्धेत विजयाची नोंद केलेली नाही. त्यामुळे पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  या सामन्यात दिल्लीने सावध सुरुवात केली खरी पण दोन धक्के बसल्यानंतर धावसंख्या धीम्या गतीने पुढे सरकली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऋतिक शोकिनच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नरचं उजव्या हाताने खेळणं सर्वांना आश्चर्यचकीत करून गेलं. त्याच्या या खेळीमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यापूर्वी डेविड वॉर्नर उजव्या हाताने फलंदाजी करताना दिसला होता. त्यामुळे तो कसोटीत उजव्या हाताने गोलंदाजी करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र तेव्हा त्याने तसं काही केलं नाही. मात्र त्याने हा प्रयोग आयपीएलमध्ये मुंबई विरुद्धच्या सामन्यात केला.

दिल्लीकडून डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही जोडी मैदानात आली. दोन्ही खेळाडूंनी सावध खेळीने सुरुवात केली. ही जोडी फोडण्यात ऋतिक शोकीनला यश आलं. पृथ्वी शॉ त्याच्या गोलंदाजीवर 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेविड वॉर्नर आणि मनिष पांडे जोडी मैदानात चांगली जमली. त्यानंतर ऋतिकने आठव्या षटकातील तिसरा चेंडू मनिष पांडेला नो टाकला त्यावर फ्री हीट मिळाला.  मात्र एक रन काढल्याने डेविड वॉर्नरला स्ट्राईक मिळाला.

डेेविड वॉर्नरने डावखुरा पद्धतीने फलंदाजी करण्याऐवजी उजव्या हाताने गोलंदाजीला सामोरा गेला. यामुळे मैदानात उपस्थित खेळाडूंसह समालोचकांना सुद्धा प्रश्न पडला नेमकं डेविड वॉर्नरला झालं तरी काय? पण फ्री हीट असलेला चेंडू वाया गेला. म्हणजेच त्या चेंडूवर षटकार किंवा चौकाराऐवजी एक धावेवर समाधान मानावं लागलं. यावर आता काही मीम्स व्हायरल होत आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.