IPL 2025 : ईशान किशनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप, मग पर्पल कॅपचा मानकरी कोण?

IPL 2025 Orange Cap, Purple Cap Holder : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 5 सामने पूर्ण झाले आहेत. त्यात एक शतक ठोकल्या गेले आहे. तर इतर खेळाडूंनी अर्धशतकं ठोकली आहेत. मग या नारंगी आणि जांभळ्या टोपीचा कोण आहे मानकरी?

IPL 2025 : ईशान किशनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप, मग पर्पल कॅपचा मानकरी कोण?
या टोपीखाली दडलंय काय?
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 26, 2025 | 4:00 PM

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे IPL चे आतापर्यंत 5 सामने झाले आहेत. सर्व संघांनी एक एक सामना खेळला आहे. या पाच सामन्यानंतर नारंगी आणि जांभळ्या टोपीचा मानकरी कोण आहे, याची चर्चा क्रिकेट फॅन्समध्ये रंगली आहे. आगामी सामन्यात तर ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चुरस निर्माण होणार आहे. एक गोष्ट खास आहे की, ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत सहभागी टॉप 5 खेळाडूंमध्ये तीन भारतीय आहेत. तर पर्पल कॅपच्या स्पर्धेतील टॉप 5 मध्ये चार भारतीय आहेत.

ते भारतीय खेळाडू कोण?

IPL 2025 च्या ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत टॉप 5 खेळाडूंमध्ये तीन भारतीय आहेत. त्यात ईशान किशन हा शतकी खेळी खेळून सर्वात आघाडीवर आहे. त्याने राजस्थान रॉयल्सच्या विरोधात 106 धावांची खेळी खेळली आहे. दुसर्‍या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. त्याने गुजरातविरोधात 97 धावा चोपल्या आहेत. यादीत तिसर्‍या क्रमांकावर निकोलस पूरन हा आहे. त्याने दिल्लीविरोधात 75 धावांची दमदार खेळी खेळली. चौथ्या क्रमांकावर साई सुदर्शन हा भारतीय आहे. त्याने पंजाबविरोधात 74 धावा केल्या आहेत. तर पाचव्या स्थानी 72 धावांच्या खेळीसह मिचेल मार्श हा आहे.

जांभळ्या टोपीचा मालक कोण?

तर Purple Cap च्या स्पर्धेत सर्वात आघाडीवर नूर अहमद हा आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरोधात चेन्नई सुपर किंग्ससाठी 4 बळी घेतले. त्याशिवाय खलील अहमद, क्रुणाल पांड्या, आर साई किशोर आणि विग्नेश पुथूर या खेळाडूंनी प्रत्येकी तीन बळी घेतले आहे. या सर्व खेळाडूंनी एक एक सामना खेळला आहे.

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप म्हणजे काय?

ऑरेंज कॅप : आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. हंगाम संपेपर्यंत जो खेळाडू सर्वाधिक धावा करतो, तो ही कॅप जिंकतो. यापूर्वी काही भारतीय खेळाडूंनी या कॅपवर नाव कोरलेले आहे.

विराट कोहली (2016) – 973 धावा (सर्वाधिक)

डेविड वॉर्नर (2015, 2017, 2019)

जोस बटलर (2022)

पर्पल कॅपचा मानकरी कोण : IPL हंगामात सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. स्पर्धा सुरू असताना जो गोलंदाज सर्वाधिक बळी घेतो,त्याला या कॅपचा दावेदार मानण्यात येते. यापूर्वीच्या हंगामात काही प्रसिद्ध पर्पल कॅप विजेते खेळाडू आहेत.

ड्वेन ब्रावो (2013) – 32 बळी

भुवनेश्वर कुमार (2016, 2017)

हर्षल पटेल (2021) – 32 बळी