AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 New Schedule: आयपीएलवर महत्वाचे अपडेट, देशभरात होणार सामने…कधी होणार नवीन तारखांची घोषणा

IPL 2025 New Schedule: आयपीएल पुन्हा देशभरात सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आता सामने केवळ दक्षिण भारतात नाही तर देशभरात होणार आहे.

IPL 2025 New Schedule: आयपीएलवर महत्वाचे अपडेट, देशभरात होणार सामने...कधी होणार नवीन तारखांची घोषणा
IPL
| Updated on: May 11, 2025 | 10:36 AM
Share

IPL 2025 New Schedule: भारत-पाकिस्तान तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 स्थगित करण्यात आली होती. परंतु आता दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीचा निर्णय झाला. त्यामुळे आयपीएल पुन्हा देशभरात सुरु होणार आहे. बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आता सामने केवळ दक्षिण भारतात नाही तर देशभरात होणार आहे. सामन्याची नवीन तारखांची घोषणा लवकरच होणार आहे. आयपीएलचे अजून १६ सामने राहिले आहेत.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी झाली आहे. त्यामुळे आता केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात सामने होणार आहे. यापूर्वी आयपीएलची सामने केवळे बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये होणार आहे, असे वृत्त आले होते.

बीसीसीआयची महत्वाची बैठक आज होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत आयपीएलचे सामने पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय होणार आहे. काही खेळाडू त्यांच्या देशात परत गेले आहे. त्यांची उपलब्धता लक्षात घेऊन आयपीएल सामन्याचे नियोजन करण्यात येणार आहे. आता आयपीएल लीग टप्प्यात फक्त 12 सामने शिल्लक आहेत. त्यानंतर चार प्लेऑफ सामने होणार आहेत.

IPL 2025 मध्ये आतापर्यंत काय झाले?

IPL चे या हंगामातील 57 सामने पूर्ण झाले आहेत. 58 वा सामना 8 मे रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे होणार होता. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना सुरु झाला होता. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे 10.1 षटकानंतर हा सामना थांबवला. पंजाब किंग्सने 10.1 षटकात 1 गडी गमावून 122 धावा केल्या होत्या. प्रियांश आर्यने 5 चौकार आणि सहा षटकाराच्या मदतीने 34 चेंडूवर 70 धावा केल्या. प्रभसिमरन सिंह याने 28 चेंडूचा सामना करत 50 धावा केल्या होता. आता हाच सामना पुढे सुरु होणार आहे की नवीन सामना खेळणार? याबाबत निर्णय झाला नाही.

2009 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल दक्षिण आफ्रिकेत झाली होती. 2020 मध्ये एप्रिल-मे मध्ये कोविडमुळे यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....