IPL 2026 : गुजरातचे खेळाडू तासभर सुनसान रस्त्यावरच… रात्रीचा किर्र अंधार… जीवाची घालमेल, खेळाडूंना त्याक्षणी फुटला घाम; नेमकं काय घडलं? Video समोर

Gujarat Titans Bus Caught Fire : IPL 2026 फायनलनंतर गुजरात टायटन्सचे खेळाडू जेव्हा हॉटेलवर परत जात होते तेव्हा त्यांच्या बसला अचानक आग लागली. सुमारे तासभर हे खेळाडू रस्त्यावरच होते. त्या क्षणाचा व्हिडीओही समोर आलाय.

IPL 2026 : गुजरातचे खेळाडू तासभर सुनसान रस्त्यावरच... रात्रीचा किर्र अंधार... जीवाची घालमेल, खेळाडूंना त्याक्षणी फुटला घाम; नेमकं काय घडलं? Video समोर
गुजरातच्या खेळांडूना रस्त्यावर बसाव लागलं
| Updated on: Jun 01, 2026 | 12:43 PM

IPL 2026 फायनलमध्ये गुजरातचा आरसीबीकडून पराभवा झाला. पराभवामुळे निराश झालेला गुजरातचा संघ हॉटेलववर परत जात असतानाच आणखी एक मोठा अपघात झाला. हॉटेलवर जाणाऱ्या, खेळाडूंनी खचाखच भरलेल्या गुजरातच्या टीमच्या बसला अचानक आग लागली. त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आलाय. खेळाडू हॉटेलकडे जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला, मात्र सुदैवाने सर्व खेळाडूंना बसमधून सुखरूप बाहेर काढून दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आले . मात्र त्यापूर्वी सर्व खेळाडूंना सुमारे एक तास रस्त्यावरच थांबावे लागले. या काळात पोलिसांनी खेळाडूंच्या भोवती सुरक्षा घेरा घातला होता आणि त्याचवेळी चाहते मोठ्या संख्येने जमा होऊ लागले होते. मोहम्मद सिराजनेही रस्त्यावर बसलेला स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

बसला कशी लागली आग ?

गुजरात संघाच्या बसला लागलेल्या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे लक्षात येताच खेळाडूंना बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कोणत्याही चाहत्यांकडून खेळाडूंना त्रास होऊ नये, यासाठी बससोबत असलेले पोलीस कर्मचाऱ्यांचा खेळाडूंभोवती बंदोबस्त तैनात करण्यात आला.

कारण रस्त्यावर उभी असलेली टीमची बस आणि रस्त्यावर बसलेले खेळाडू पाहून येणारे-जाणारे थांबले होते. काहींनी फोटो काढायला सुरुवात केली, तर काहींनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. याच दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी इतर कोणत्याही वाहनांना तिथे थांबण्यापासून रोखले आणि चाहत्यांना खेळाडूंपर्यंत पोहोचून दिलं नाही. कडक सुरक्षा व्यवस्था होती.

 

मोहम्मद सिराजने शेअर केला फोटो

गुजरातटीमचा खेळाडू मोहम्मद सिराज यानेही इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो , इशांत शर्मा, साईं किशोर सोबत रस्त्यावर बसलेला दिसला. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्यानंतर खेळाडूंना बसमधून खाली उतरवण्यात आले आणि दुसऱ्या बसची व्यवस्था केली जात होती, तेव्हाचा हा फोटो आहे.

 

आयपीएल फायनलविषयी सांगायतं झालं तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 155 धावा केल्या. संघाचे सलामीवीर (शुभमन गिल आणि साई सुदर्शन) मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्याने, त्यांनी फलंदाजीचा क्रम बदलून निशांत सिंधूला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले, पण हा निर्णय चुकीचा ठरला. वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकामुळे (५०) संघाला एक सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. मात्र, विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे आरसीबीने सहजपणे लक्ष्य गाठले आणि 5 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. आरसीबीची ही सलग दुसरी आयपीएल ट्रॉफी आहे.

Follow Us