IPL 2026, PBKS vs GT : हाता-तोंडाशी आलेला विजय निसटला, गुजरातच्या पराभवानंतर खवळलेल्या शुबमनने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?

Shubman Gill Statement After Defeat Against Punjab Kings : आयपीएल 2026 स्पर्धेत काल पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघाचा सामना झाला. सुरूवातीला एकतर्फी मॅच वाटत होती, पण नंतर गुजरातने जवळपास बाजी उलटवली होती. मात्र हातात आलेली मॅच गुजरातने गमावली आणि पंजाबचा विजय झाला. यानंतर गुजरातचा कर्णाधर शुबमन गिलने...

IPL 2026, PBKS vs GT : हाता-तोंडाशी आलेला विजय निसटला, गुजरातच्या पराभवानंतर खवळलेल्या शुबमनने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?
गुजरातचा पराभव कोणामुळे ?
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 01, 2026 | 9:35 AM

न्यू चंडीगडमध्ये आयपीएल 2026 स्पर्धेतील चौथा सामना खेळवण्यात आला. पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ या सामन्यात एकमेकांशी भिडले. हा सामना चुरशीचा झाला. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या गुजरातच्या संघाने पक्त 162 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर देत टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या पंजाबच्या संघाने सुरूवात तर चांगली केली. मात्र काही वेळातच खेळ पलटला आणि गुजरातच्या उत्तम खेळामुळे पंजाबच्या संघाची 118-6 आणि 144 ला 7 गडी बाद अशी अवस्था होती. जवळपास गमावत आलेला सामना आता गुजरात जिंकेल अशा आशा निर्माण झाल्या मात्र तेवढ्यात कूपर कोनोलीने शानदार खेळी करत गुजरातच्या हाता-तोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला आणि पंजाबने विजयी सलामी दिली. या मॅचनंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिल याने पराभवाचं कारण स्पष्ट शब्दांत सांगितलं.

कोणामुळे झाली हार ?

या सामन्यानंतर शुभमन गिल स्पष्टच बोलला. “मला वाटतं आम्ही चांगली गोलंदाजी केली, पण शेवटच्या पाच-सहा षटकांमध्ये आम्हाला लय सापडली नाही. फलंदाजी करताना, ही खेळपट्टी 210-220 वांसाठी अनुकूल वाटत नव्हती, पण मला वाटतं की जर आम्ही 175 किंवा 180 धावा केल्या असत्या, तर आज निकाल वेगळा लागला असता. चेंडू जुना झाल्यावर तो सरळ मारणं कठीण झालं. दुसऱ्या डावात सतत पाऊस पडत होता, त्यामुळे चेंडू ओला झाला, ज्यामुळे फलंदाजीची परिस्थिती थोडी सुधारली” असं शुबमनने नमूद केलं.

“दुसऱ्या डावात धावगती तितकी मंदावली, असं मला वाटत नाही. तरीही आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही दबाव कायम ठेवला. मी (प्रसिद्धला उशिरा गोलंदाजीला आणण्याचा) विचार करू शकलो असतो, पण तो योग्य वेळी आला, त्याने बळी घेतले आणि 17 व्या आणि 18 व्या षटकांपर्यंत सामन्यात आमचं आव्हान टिकवून ठेवलं. सगळं काही ठीक आहे, पण त्यावेळी आम्हाला वाटलं की जर खेळपट्टी थोडी संथ होत असेल, तर कदाचित एखादा वेगवान गोलंदाज आम्हाला काही बळी मिळवून देऊ शकेल, आणि तो नेट्समध्ये खूप चांगली गोलंदाजी करत होता. आमचा हाच विचार होता. अशोक (शर्मा) बद्दल बोलायचं झालं तर, तो खेळावर खूप मेहनत घेतो; तो आमच्यासाठी एक चांगला शोध आहे” अही शुबमनने सांगितलं.

“त्याने सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली आणि जसजसा तो अधिक सामने खेळेल आणि अनुभव मिळवेल, तसतसा तो शेवटीही आमच्यासाठी खूप मौल्यवान ठरेल, असं माल वाटतं”, असं शुबमन म्हणाला. “तो आपल्या खेळावर खूप मेहनत घेतो आणि आमच्यासाठी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. खरं तर, मी त्याला काही महिन्यांपूर्वी कॅम्पदरम्यान भेटलो होतो आणि नव्या चेंडूने त्याची गोलंदाजी पाहून खूप प्रभावित झालो होतो. आशा आहे की, त्याला काही सामन्यांमध्ये नव्या चेंडूने आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल” अशी आशा शुबमनने व्यक्त केली.

पराभवानंतर संघाला मेसेज काय ?

या पराभवानंतर आपल्या संघाला काय मेसेज देशील, या प्रश्नावर गिल म्हणाला, “दुर्दैवाने, या सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही, पण मला वाटतं की आम्ही चांगली कामगिरी केली. फक्त, आणखी सुधारणा करत राहिल्या पाहिजेत, अधिक उत्साहाने खेळत राहिलं पाहिजे आणि आपले सर्वोत्तम दिलं पाहिजे” असं त्याने सांगितलं.

 

 

Follow Us