AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Sunrisers Hyderabad Team 2021 | मराठमोळा केदार जाधव हैदराबादकडून खेळणार, पाहा संपूर्ण टीम

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच्या लिलावातून (IPL Auction 2021) सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) सर्वात कमी म्हणजेच 3 खेळाडू खरेदी केले आहेत.

IPL Sunrisers Hyderabad Team 2021 | मराठमोळा केदार जाधव हैदराबादकडून खेळणार, पाहा संपूर्ण टीम
आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीच्या लिलावातून (IPL Auction 2021) सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) सर्वात कमी म्हणजेच 3 खेळाडू खरेदी केले आहेत.
| Updated on: Feb 19, 2021 | 4:40 PM
Share

चेन्नई | आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव 18 फेब्रुवारीला (IPL Auction 2021) चेन्नईत पार पडला. या लिलावात एकूण 298 खेळाडूंपैकी 57 खेळाडूंना 8 फ्रँचायजींनी विकत घेतले. दरम्यान सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) या लिलावातून सर्वात कमी म्हणजेच 3 खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केलं आहे. यामध्ये केदार जाधव, मुजीब उर रेहमान आणि जगदीश सुचिथ यांचा समावेश आहे. (ipl auction 2021 Sunrisers Hyderabad team see full players list 2021)

हैदराबादने केदार जाधवला (Kedar Jadhav) त्याच्या बेस प्राईज अर्थात 2 कोटींमध्ये खरेदी केलं. केदारला चेन्नई सुपर किंग्जसने (CSK) करारमुक्त केलं होतं. केदारने 13 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे चेन्नईने करारमुक्त केलं. तसेच केदार व्यतिरिक्त हैदराबादने (mujib ur rehman) मुजीब उर रहमानला 1. 50 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. तर जगदीशा सुचितसाठी (jagadeesha suchith) हैदराबादने 30 लाख मोजले.

हैदराबादला आतापर्यंत एकदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावण्यात यश आले होते. हैदराबादने 2016 मध्ये ही कामगिरी केली होती. हैदराबादने गेल्या मोसमात टॉप 3 मध्ये एंट्री मारली होती. मात्र क्वालिफायर 2 सामन्यात दिल्लीकडून पराभव झाल्याने हैदराबादचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर संपला होता. हैदराबादने गेल्या मोसमात एकूण साखळी फेरीतील 14 सामन्यांमधून 7 सामन्यात विजय मिळवला होता.

कॅप्टन डेव्हिड वॉर्नरचा अपवाद वगळला तर हैदराबादकडे दिग्गज फलंदाज नाहीत. याचाच फटका हैदराबादला बसला होता. दरम्यान या मोसमात केदार जाधव संघासोबत जोडला गेला आहे. यामुळे केदार या मोसमात हैदराबादसाठी काय कामगिरी करतो, याकडे सर्व महाराष्ट्राचं आणि हैदराबादचं लक्ष असणार आहे.

यॉर्कर किंग थंगारासू नटराजन

थंगारासून नटराजन गेल्या वर्षी अनकॅप्ड खेळाडू होता. त्याने एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुच्या एबी डी व्हीलियर्सला यॉर्कर चेंडूवर बोल्ड केलं होतं. यासह त्याने संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. तेव्हापासून नटराजन यॉर्कर किंग म्हणून उदयास आला. तो या 13 व्या मोसमात सर्वाधिक यॉर्कर टाकणारा गोलंदाज ठरला. त्यानंतर नटराजनने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं. यामुळे या मोसमात नटराजन कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

Sunrisers Hyderabad ने कायम राखलेले खेळाडू

डेव्हिड वॉर्नर, राशिद खान, मोहम्‍मद नबी, अभिषेक शर्मा, रिद्धिमान साहा, बासिल थंपी, जेसन होल्‍डर, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, विराट सिंह, टी. नटराजन, अब्‍दुल समद, केन विलियमसन, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, जॉनी बेयरस्‍टो, मनीष पांडे, विजय शंकर, मिचेल मार्श, सिद्धार्थ कौल, प्रियम गर्ग आणि श्रीवत्‍स गोस्‍वामी.

सनरायजर्स हैदराबादने लिलावातून खरेदी केलेले खेळाडू

केदार जाधव – 2 कोटी

मुजीब उर रेहमान – 1 कोटी 50 लाख

जगदीश सुचिथ – 30 लाख

संबंधित बातम्या :

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, नेटकऱ्यांकडून जोरदार टीका

IPL Rajasthan Royals Team 2021 | ख्रिस मॉरिसकडून रेकॉर्ड ब्रेक, विराटचा ‘हा’ खेळाडूही ताफ्यात, पाहा राजस्थानची टीम

IPL Mumbai Indians Team 2021 | वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूसह अनेक अनुभवी खेळाडू, पाहा मुंबई इंडियन्सची टीम

(ipl auction 2021 Sunrisers Hyderabad team see full players list 2021)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.