IPL 2022 Orange Cap : ऑरेंज कॅपवर जॉस बटलरची पकड कायम, पर्पल कॅपचा मानकरी युझवेंद्र चहल

| Updated on: Apr 11, 2022 | 8:58 AM

रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) लखनौ सुपर जायंट्सचा 3 धावांनी पराभव केला. तसेच दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 44 धावांनी विजय मिळवून दोन सामन्यातील पराभवाची मालिका पूर्ण केली.राजस्थान रॉयल्स +0.951 च्या नेट रन रेटसह (NRR) पॉइंटने गुणतालिकेत वरच्या स्थानी आहे.

IPL 2022 Orange Cap : ऑरेंज कॅपवर जॉस बटलरची पकड कायम, पर्पल कॅपचा मानकरी युझवेंद्र चहल
ऑरेंज कॅपवर जॉस बटलरची पकड कायम
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई – रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) लखनौ सुपर जायंट्सचा 3 धावांनी पराभव केला. तसेच दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 44 धावांनी विजय मिळवून दोन सामन्यातील पराभवाची मालिका पूर्ण केली.राजस्थान रॉयल्स +0.951 च्या नेट रन रेटसह (NRR) पॉइंटने गुणतालिकेत वरच्या स्थानी आहे. तर लखनौ सुपर जायंट्स +0.174 च्या NRR सह पाचव्या स्थानावर घसरले आहे. कोलकाता नाइट रायडर्स त्यांच्या हंगामातील दुसर्‍या पराभवासह +0.446 च्या NRR सह दुसर्‍या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स +0.476 च्या NRR सह सहाव्या स्थानावर आहे.

ऑरेंजर कॅपवर आपली पकड कायम ठेवली

राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने 4 सामन्यांत 218 धावा करून ऑरेंजर कॅपवर आपली पकड कायम ठेवली, त्याने शतकी खेळी केली.लखनौ सुपर जायंट्सच्या क्विंटन डी कॉक 188 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्सचा शुभमन गिल 180 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा इशान किशन 149 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा शिमरॉन हेटमायर १६८ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

पर्पल कॅपचा मानकरी युझवेंद्र चहल

राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आयपीएल 2022 मध्ये 11 विकेट्ससह सर्वाधिक बळींच्या यादीत अग्रस्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव त्याच्या 10 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे तर दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव तिसऱ्या स्थानावर आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वानिंदू हसरंगा 8 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे, दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान पाचव्या स्थानावर आहे.

Aurangabad | “दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत…” कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडीओवर तृप्ती देसाईंचं परखड मत

Chanakya Niti | सावधान ! आयुष्यातील 5 घटना देताता आर्थिक संकटाचे संकेत, आताच सावध व्हा

Aurangabad | औरंगाबादेत कोरोना आटोक्यात, पण लसीकरणासाठी मनपा आग्रही, घरी जाऊन दुसरा डोस देणार!