Maharashtra News Live Update : पुण्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा खुलासा, म्हणतात सदावर्तेंनी…

| Updated on: Apr 11, 2022 | 11:11 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : पुण्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा खुलासा, म्हणतात सदावर्तेंनी...
गुणरत्न सदावर्ते यांना नागपुरातून कुणाचा फोन आला?Image Credit source: tv9

मुंबई : आज सोमवार 11 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. पीएमईजीपी महाडा कॉलनी येथे काही अज्ञात लोक बाईक वर स्वार होऊन आले अनेक गाड्यांचे तोडफोड केली मोठ्या प्रमाणात व्हिडिओ वायरल होत होती घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सदर घटना बाबत पोलीस अधिक तपास सुरू केला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Apr 2022 09:48 PM (IST)

    भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची विशेष कामगिरी

    चिनूक हेलिकॉप्टरने सर्वात जास्त प्रवास केला

    चंदीगड ते जोरहाट (आसाम) पर्यंत उड्डाण करत रचला विक्रम

    भारतातील सर्वात लांब नॉन-स्टॉप हेलिकॉप्टर प्रवास

    1910 किलोमीटरचा मार्ग 7 तास 30 मिनिटांत पूर्ण केला

    IAF द्वारे ऑपरेशनल प्लॅनिंग आणि अंमलबजावणीसह उड्डाण यशस्वी

    चिनूकच्या कामगिरीमुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढली

  • 11 Apr 2022 08:37 PM (IST)

    सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले

    गुणरत्न सदावर्तें आणि जयश्री सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले

    स्वारगेट आगारातील कर्मचाऱ्यांची टीव्ही 9 मराठीला माहिती

    पुण्यातून 1 लाख 10 हजार रुपये केले जमा

    अजयकुमार गूजर यांनी पैसे जमा करायला सांगितलं होतं कर्मचाऱ्याचा गौप्यस्फोट

    गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात घेतले फॉर्म भरून

    प्रत्येक कर्मचाकडून 540 रुपये घेतले

  • 11 Apr 2022 07:53 PM (IST)

    जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे यांच्या पतीची युवकाला मारहाण

    काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे यांच्या पतीची युवकाला मारहाणीचा व्हिडिओ वायरल..

    नागपूर जिल्ह्यातील उमरेड परिसरातील घटना..

    आंबेडकर जयंतीच्या वर्गणी करिता वाद होऊन मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती..

    अश्लील शिवीगाळ करत केली मारहाण

  • 11 Apr 2022 06:54 PM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब Live

    किरीट सोमय्या यांनी पैसे तर गोळा केले आहेत

    याची चौकशी तर होणार

    जगाला सांगत होते गुन्हेगार नाही

    तर आता लपताय कशाला, रडताय कशाला, या आता पोलिसांसमोर

    आता पोलीस गुन्ह्याचं स्वरुप बघून निर्णय घेतील

    आजच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना दिलेल्या मुदतीबाबत चर्चा

    ही सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत

    गाड्या आणि रुटच्या नियोजनबाबतही चर्चा झाली

  • 11 Apr 2022 06:50 PM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब Live

    दोन वर्षात एसटीचे मार्ग विस्कटले आहेत

    पवारांच्या घरावरील आंदोलनात सहभागी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

    गंभीर गुन्ह्यात सामील असलेल्यांवर कारवाई करण्याची तरतूद एसटीमध्ये आहे

    गुणरत्न सदावर्ते एसटी आंदोलनाचे सुत्रधार आहेत

    सदावर्ते यांनी पैसे लाटल्याचा आरोप

    पोलीस त्याचा तपास करत आहेत

    एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याचा आरोप

    चार ते पाच पोलीस स्टेशनमध्ये पैसे उकळल्याच्या तक्रारी

    एसटीत एक लाख कामगार आहे

    कोट्यवधी रुपये होता

    हे पैसे गेले कुठे

    कालच्या हल्ल्यात हे पैसे वापरले का

    हे हळूहळू बाहेर येईल

    सदावर्तेंनी केलेल्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास होईल

  • 11 Apr 2022 06:36 PM (IST)

    भाजपवर संजय राऊतांचा हल्लाबोल

    सोमय्या बापबेटे जेलमध्ये जातीलच. पण जाता जाता भाजपचे हात बुडताना पकडले आहे. - संजय राऊत

    पाहा व्हिडीओ :

  • 11 Apr 2022 06:34 PM (IST)

    ईडी कार्यालयात काय करतो हा माणूस? राऊतांचा सवाल

    ईडीच्या कार्यालयात काय करतो हा माणूस, हे पण मी लवकरच उघड करणार आहे. ब्लेकमेल करुन, लोकांना धमक्या देऊन, सोमय्यांनी कोट्यवधी रुपये गोळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

  • 11 Apr 2022 06:31 PM (IST)

    किरीट सोमय्यांनी गोळा केलेले पैसे भाजपनं निवडणुकीत वापरले- राऊत

    किरीट सोमय्यांवर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय, की...

    भाग सोमय्या भाग, हा नवीन सिनेमा कश्मीर फाईल्स वाल्यांनी काढायला पाहिजे. गुन्हा केला नाही, घाबरत नाही, असं म्हणताय, कोर्टाला कायद्याला सामोरं जा म्हणता, मग कशाला पळताय

    तुम्ही कायद्याचं पालन करण्याबाबत लोकांना ज्ञान देता ना, मग पळता कशाला

    आयएनएल विक्रांतच्या बाबतीत जो दळभद्रीपणा जो झाला, असा देशात कधीच झालेला नाही.. ज्या विक्रांत युद्धनौकेमुळे पाकचा पराभव करु शकलो, पाकची फाळणी करु शकलो. कराची, चितगाव बंदरं बेचिराख करु शकतो... अशा महाकाय युद्धनौका जतन करायला पाहिजे... स्मरणात राहिली पाहिजे, असं आम्हालाही वाटत होती.. केंद्रात आम्ही राष्ट्रपतींना त्यासाठी भेटलो.. या महाशयांनी पैशे गोळा करायला सुरुवात केली.. 2013चं ट्वीट आहे.. नुसते डबे नाही फिरवले यांनं... त्याच्या सातशे अकरा असे मोठे मोठे डबे भरले गच्च.. ठिकठिकाणी याशिवाय ...नावावर पैसे गोळा गेले..

    पण मला माहितीये ना कोट्यवधी रुपये जमा केले.. ५८ कोटी तर मीच सांगतो.. ट्वीटवर त्यांनी सांगितली १४० कोटी.. तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की राजभवनाचं अकाऊंट नाही.. नव्हतं तर मुख्यमंत्री निधीत किंवा केंद्रात द्यायचे पैसे.. आता म्हणताय पक्षाकडे दिले पैसे...

    म्हणजेच मी जे सांगत होतो. की त्यांनी हे पैसे निवडणुकीत वापरले... ते सिद्ध झालंय आता...

    उरलेले पैसे त्यांनी निकॉन इन्फ्रातून पीएमसी बँकेत पांढरे करुन वळवले..

  • 11 Apr 2022 06:22 PM (IST)

    राऊतांचं सोमय्यांवर खोचक ट्विट

  • 11 Apr 2022 05:20 PM (IST)

    गुणरत्न सदावर्तेंना 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

    गुणरत्न सदावर्तेंना 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी हल्ल्याप्रकरणातून अटक करण्यात आली होती. सोमवारी न्यायालयानं महत्त्वपूर्ण सुनावणी देत सदावर्तेंच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केली आहे. यामुळे आता सदावर्तेंचा पोलीस कोठडीती मुक्काम वाढलाय.

  • 11 Apr 2022 05:11 PM (IST)

    कोर्टातला युक्तीवाद पूर्ण झाला

    सदावर्तेंची कोठडी वाढण्याची शक्यता

    दोन्ही बाजुने जोरदार युक्तीवाद

    सरकारी वकीलांनी अकरा दिवसांची कोठडी मागितली

    कोठडीची गरज नसल्याचे सदावर्तेंच्या वकीलांनी सांगितलं

    सदावर्तेंना आज बेल की जेल?

    सचिदानंद पुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

    सचिदानंद पुरी या केसमध्ये महत्वाचा दुवा

    कोर्टात फेसबुक लाईव्ह केल्याची माहिती

    काही वेळातच सदावर्तेंवर निकाल येणार

  • 11 Apr 2022 04:50 PM (IST)

    एसटी महामंडळाची बैठक सुरू

    पवारांच्या घराबाहेरील आंदोलनाप्रकरणी अनिल परब यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

  • 11 Apr 2022 04:49 PM (IST)

    सदावर्तेंच्या वकील गिरीश कुलकर्णी यांचा युक्तीवाद

    पवरांच्या घराचं कोणतही नुकसान झालं नाही

    फक्त चप्पल फेक झाली

    यात कुणलाही इजा झाली नाही

  • 11 Apr 2022 04:32 PM (IST)

    सरकारी वकील घरत यांचा युक्तीवाद

    नागपूरमधून कोणत्या व्यक्तीचा फोन आला हे आम्हाला माहिती आहे

    त्या व्यक्तीचं नाव उघड सांगू शकत नाही

    कोर्टाला त्या व्यक्तीची माहिती दिली

    हवेतला आरोप असल्याचा कुलकर्णी यांचा युक्तीवाद

  • 11 Apr 2022 04:23 PM (IST)

    सदावर्तेंच्या वकील गिरीश कुलकर्णी यांचा युक्तीवाद

    पैसे गोळा केल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली नाही तर कोर्टात त्याचा उल्लेख का

    हल्ला होणार हे पोलिसांना माहिती असून पोलीस का नव्हते

    आंदोलकांनाच तिथे धक्काबुक्की झाली

    स्कॉटलँड दर्जाचे पोलीस गाफील का राहिले

    या आंदोलनात फक्त एसटी कर्मचारी होते

    या आंदोलनाला हल्ला म्हणता येणार नाही

    एसटी कर्मचाऱ्यांचा कुणालाही इजा पोहचवण्याच उद्देश नव्हता

    कर्मचाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीत कर्मचारी बेशुद्ध झाले

    चंद्रकांत सुर्यवंशी या न्यूज चॅनलच्या पत्रकाराचा काय संबंध

    हा प्रमुख आरोपी असल्याचा प्रदीप घरत यांचा दावा

    सदावर्तेंना त्याने फोन केला एवढेच, बाकी त्यांचा काही संबंध नाही

    सुर्यवंशीचा पोलिसांकडून शोध सुरू

    सदावर्ते घटनास्थळी नव्हते

    पाचशे तीस रुपयांचा उल्लेख करून तुम्हाला काय शोधायचं होतं

  • 11 Apr 2022 04:05 PM (IST)

    सदावर्ते प्रकरणात पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही

    शरद पवारांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही

    मोहम्मद शेखने लोक जमल्याचा आरोप

  • 11 Apr 2022 03:47 PM (IST)

    सदावर्तेंना नागपुरातून आलेला फोन कुणाचा?

    सदावर्ते सतत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते-सरकारी वकील

    चार एसटी कर्मचारी फरार असल्याची माहिती दिली

    हल्ल्याआधी बैठक झाल्याची पोलिसांची माहिती

    अभिषेक पाटीलची आंदोलनात महत्वपूर्ण भूमिका

    आजपर्यंत सदावर्तेंनी दीड कोटी गोळा केल्याचा दावा

    या बाबींच्या तबासासाठी कोठडी महत्वाची असल्याचं वकिलांचं सांगणं

    मोहम्मद सादीक शेख महत्वाचा आरोपी

    सावधान शरद...सावधान, अशा आशयाचा बॅनर छापला होता

  • 11 Apr 2022 03:42 PM (IST)

    गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांनी आणखी कोठडी मागितली

    सातारा पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी कोर्टात दाखल

    साताऱ्यात मराठा समाजाच्या आरक्षण प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल

    सातारा पोलिस न्यायालयाकडे मागणार सदावर्तेंचा ताबा

  • 11 Apr 2022 03:23 PM (IST)

    गुणरत्न सादवर्ते यांची कोर्टा सुनावणी सुरू

    जयश्री पाटील सुनावणीला नाहीत

    सातारा पोलीसही कोर्टात हजर

    सदावर्ते यांनी मुलगी आणि वकिलांशी बातचीत केली

  • 11 Apr 2022 03:09 PM (IST)

    सदावर्तेंना कोर्टात हजर केलं, बेल की जेल?

  • 11 Apr 2022 03:00 PM (IST)

    पोलीस सदावर्तेंना घेऊन कोर्टाकडे रवाना

    पोलिसांकडून सदावर्तेंची कोठडी वाढवून मागितली जाणार

    शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलनाप्रकरणी सदावर्ते अटकेत

    सदावर्तेंना बेल की जेल?

  • 11 Apr 2022 02:23 PM (IST)

    ईडी, सीबीआयचा वापर करून भाजप लढतंय - छगन भूजबळ

    राज ठाकरेंना काय झालं, ते आमच्यासोबत आहेत

    आता भाजपसोबत आहे.

    महाविकास आघाडीच्या विरोधात बोलायला लागले

    ईडी, सीबीआयचा वापर करून भाजप लढतंय

    किरीट सोमय्या कुठे गेले आहेत हे संजय राऊतांना माहित आहे

    जिथं भाजपचं सरकार नाही, त्या राज्याला केंद्राकडून धोका आहे

    सात वर्षापासून आम्ही भांडतोय

    सुरुवातीला म्हणाले आमच्याकडे डाटा आहे, पण आता डायरेक्ट नाही असं म्हणत आहेत

  • 11 Apr 2022 02:06 PM (IST)

    प्रत्येक युनीटमागे १३ टक्के दरवाढ झालीय. ही राज्यातील सर्वात मोठी दरवाढ आहे - चंद्रशेखर बावनकुळे

    - प्रत्येक युनीटमागे १३ टक्के दरवाढ झालीय. ही राज्यातील सर्वात मोठी दरवाढ आहे

    - केंद्र सरकारच्या तीन्ही कंपन्यांनी राज्य सरकारला कोळसा स्टॅाक करण्याबाबत अनेक पत्र दिले. पण यांनी कोळसा स्टॅाक केला नाही

    - बाहेरुन महागाची वीज घ्यावी लागली म्हणून ही दरवाढ झालीय. नियोजनशुण्य कारभारामुळे ही वीज दरवाढ झालीय

    - राज्य सरकारचा निषेध आहे. या दरवाढीचा पैसा राज्य सरकारने द्यावे, वीज दरवाढ लोकांवर लादू नये

    - राज्यात अघोषित भारनियमन सुरु आहे

    - फडणवीस सरकारने कधीही वीज दरवाढ केली नाही

    - राज्य सरकारने केलेली वीज दरवाढ राज्य सरकारच्या चुकीमुळे

    - कोल वॅाशरीज याच सरकारने सुरु केली

    - कोल वॅाशरीजमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर त्यांनी चौकशीसाठी हवी असल्यास एसआयटी लावावी.

    - कोल वॅाश करुन वापरल्यास आयात केलेला कोळसा वापरण्याची गरज नाही.

    - वीज निर्मिती कंपन्यांकडे २३ दिवसांचा कोळसा शिल्लक हवा

    - कोल कंपन्यांना देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाही

    - नितीन राऊत हतबल झालेय. तिन्ही पक्षांच्या वादामुळे वीज मंडळांचं नुकसान झालंय

  • 11 Apr 2022 01:11 PM (IST)

    राज ठाकरेंच्या भेटीनंतर मी समाधानी - वसंत मोरे

    राज ठाकरेंच्या भेटीनंतर मी समाधानी - वसंत मोरे

    मला जे मांडायचं होत ते मांडलं आहे

    सभा संपल्यानंतर उद्या सगळ्यांनी बोलणार आहेत

    मी मनसेमध्ये होतो, मनसेतचं राहणार - वसंत मोरे

    उद्याच्या उत्तरसभेत सगळ्यांना उत्तर मिळाले

    मी पुर्णपणे समाधानी आहे

    आपण मनसेतचं राहणार असल्याचे म्हटले आहे

    तब्बल एक तास बैठक झाली

    नाराज वसंत मोरे खूष झाल्याचे दिसत आहे

  • 11 Apr 2022 10:16 AM (IST)

    किरीट सोमय्या परदेशात पळून जाण्याची भीती - संजय राऊत

    घोटाळा झाला आहे

    हो छोटा घोटाळा नाही

    त्याची व्याप्ती मोठी आहे

    त्यांची माफिया गॅंग आहे

    महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुध्दा त्यांनी पैसे जमा केले आहेत

    या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे

    हे दोघे कुठे आहेत

    महाराष्ट्रात नाहीत

    माझ्या माहितीप्रमाणे भाजप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे

    जनतेच्या लोकांचा पैसा लुटला आहे

    सेव्ह विक्रांतच्या नावाने पैसे जमा केले आहेत

    अर्थिक गुन्हेकडे हा प्रकरण देण्यात आले आहेत

    देशातून पैसे जमा केले आहेत

    राकेश वाधवान संबंध किरीट सोमय्याचे संबंध होते

    फरार झाले आहेत

    देशाबाहेर पळून जाण्याचे अनेकांना भीती वाटते

    लुट आऊट नोटीस जारी करायला हवी

    माझा हा व्यक्तीगत आरोप नसून हा लोकशाहीचा आरोप आहे

    राजभवनात कालपासून किरीट सोमय्यांची माणसे जात आहेत

    हा घोटाळा मोठा असून त्यातून अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत

    लवकरच अजून काही प्रकरण बाहेर पडतील

    पवार साहेबांच्या घरावरती हल्ला करण अत्यंत चुकीचा आहे

    पोलिस तपास करीत आहेत. हे दोन आरोपी पळून जाण्याच्या तयारीत आहेत

  • 11 Apr 2022 09:58 AM (IST)

    कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याने व्यक्त केला आहे अंदाज

    कोकणात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता

    हवामान खात्याने व्यक्त केला आहे अंदाज

    सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण

    गेल्या आठवड्यापासून कोकणात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी

    आज सकाळपासून रत्नागिरीकरांना सूर्य दर्शन नाही

    किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण सदृश्य परिस्थिती

  • 11 Apr 2022 09:57 AM (IST)

    मी मनसेत आहे आणि मनसेत राहणार - वसंत मोरे

    वसंत मोरे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमीकेवर मी आजही ठाम

    मी माझी भूमिका आणि अडचण राज ठाकरेंना समजावून सांगेन

    मला राज ठाकरेंवर विश्वास नाही तर खात्री आहे की ते आमची अडचण समजून घेतील

    पक्षातील काही पार्ट टाईम पदाधिकारी तक्रार करतायेत

    मात्र राज ठाकरेंकडे मी तक्रार करणार

    मी मनसेत आहे आणि मनसेत राहणार

    राज ठाकरे माझ्या मनात आहेत आज भेटून मी माझी भूमिका मांडणार

    वसंत मोरे पक्ष सोडणार नाही आज भेट घेतोय राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर चर्चा करतात बघूयात

  • 11 Apr 2022 09:56 AM (IST)

    नव्या 20 इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

    नाशिक- नव्या 20 इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

    कंटेनर मध्येच घेतला गाड्यांनी पेट

    कंटेनरमध्ये गाड्यांनी पेट घेतलेलं 50 लाखांचे नुकसान

    अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवलेले नियंत्रण.

  • 11 Apr 2022 09:56 AM (IST)

    क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न द्या

    - क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न द्या

    - काँग्रेस नेते गिरीश पांडव यांची केंद्र सरकारकडे मागणी

    - महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त केली भारतरत्न मिळण्याची मागणी

    - महात्मा फुले यांना भारतरत्न मिळेपर्यंत शांत बसणार नाही

    - काँग्रेस नेते गिरीश पांडव यांचा केंद्र सरकारला इशारा

    - ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त नागपूरात बाईक रॅलीचं आयोजन

Published On - Apr 11,2022 6:24 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.